Redmi K90: प्रतिक्षा संपली! Redmi च्या तगड्या स्मार्टफोन्सनी चीनमध्ये केली एंट्री, हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत डिव्हाईस
Redmi K90 Pro Max ची सुरुवातीची किंमत 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी CNY 3,999 म्हणजेच सुमारे 49,000 रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,499 म्हणजेच सुमारे 55,000 रुपये, 16GB रॅम+ 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,799 म्हणजेच सुमारे 59,000 रुपये आणि टॉप-एंड मॉडेल 16GB रॅम+ 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 65,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस डेनिम, गोल्डन व्हाइट आणि ब्लॅक रंग पर्यायात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Redmi K90 या स्मार्टफोनची सुरुवातीची किेंमत 12GB रॅम+ 256GB व्हेरिअंटसाठी CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 35,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 16GB + 1TB या प्रिमियम व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 49,000 रुपये आहे. हा फोन पांढरा, काळा, अॅक्वा ब्लू आणि फिकट जांभळा रंग पर्यायात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Redmi K90 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सँपलिंग रेट, 3500 निट्सची पीक ब्राइटनेस आणि डॉल्बी व्हिजन, HDR10+ सपोर्ट ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये TSMC चा 12nm AI-पावर्ड D2 डिस्प्ले चिप देण्यात आली आहे जी विजुअल्स आणि एनर्जी एफिशियंसी दोन्ही अधिक चांगले बनवते. फोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 (3nm) चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये Qualcomm AI Engine देखील आहे. हे डिव्हाईस LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज टाइपने सुसज्ज आहे.
Redmi K90 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP (1/1.31”) प्राइमरी सेंसर OIS सह, 50MP (f/3.0) पेरिस्कोप टेलीफोटो लेंस 5x ऑप्टिकल झूम आणि 50MP (f/2.4) अल्ट्रा-वाइड लेंस यांचा समावेश आहे. स्मार्टफोनमधील हा सेटअप 8K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 32MP चा HD पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 7,560mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 100W वायर्ड, 50W वायरलेस आणि 22.5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5.4, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, गॅलिलिओ, ग्लोनास, क्यूझेडएसएस, नेव्हिक आणि ए-जीएनएसएस सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबच यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि IP68 रेटिंग देखील देण्यात आली आहे.
Redmi K90 मध्ये 6.59-इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1,156×2,510 पिक्सेल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. डिस्प्ले फीचर्स Pro Max मॉडेल सारखेच आहेत. हा फोन Snapdragon 8 Elite (Gen 4) चिपसेटने सुसज्ज आहे. यासोबतच यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP (f/1.88) मेन सेंसर (1/1.55”) OIS सह, 50MP (f/2.2) टेलीफोटो आणि 8MP (f/2.2) अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 20MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 7,100mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 100W वायर्ड आणि 22.5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्स प्रो मॅक्स मॉडेलसारखेच आहेत.






