iPhone 17 Series launch: एकच झलक, सबसे अलग! आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone लाँच, जाडी केवळ 5.6 मिमी; किंमत वाचून बसेल धक्का
iPhone 17 Air: ज्या क्षणाची टेक विश्व अगदी आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण अखेर आला आहे. टेक जायंट Apple ने त्यांच्या ‘Awe Dropping’ ईव्हेंटमध्ये आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन लाँच केला आहे. हा नवाकोरा फोन iPhone 17 Air या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा आयफोन iPhone 16 Plus ची जागा घेणार आहे. या पातळ आयफोनमध्ये iPhone 17 सीरीजचे सर्व फीचर्स आणि Apple इंटेलिजेंस सपोर्ट देण्यात आला आहे. iPhone Air हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन आहे, जो अल्ट्रा-स्लिम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये Samsung च्या Galaxy S25 Edge ला टक्कर देणार आहे.
iPhone Air ची किंमत 999 डॉलर्स म्हणजेच सुमारे 88,100 रुपयांपासून सुरु होते, ज्यामध्ये 256GB स्टोरेज देण्यातआले आहे. हा पातळ आयफोन 512GB आणि 1TB स्टोरेजमध्ये देखील उपलब्ध आहे. सर्वात पातळ आयफोन चार कलर शेड्समध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये स्काय ब्लू, लाइट गोल्ड, क्लाउड व्हाइट आणि स्पेस ब्लॅक यांचा समावेश आहे. भारतात iPhone Air ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये ठेवण्यात आली आहे. 512GB व्हेरिअंटची किंमत 1,39,900 रुपये आणि 1TB व्हेरिअंटची किंमत 1,59,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट 12 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. आयफोन एअरची डिलिव्हरी 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. (फोटो सौजन्य – X)
iPhone Air एक eSIM-ओनली हँडसेट आहे, जे iOS 26 वर आधारित आहे. या आयफोनमध्ये 6.5-इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि ProMotion फीचर्स देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा आहे की, iPhone 17 मॉडेल्सप्रमाणे, iPhone Air देखील यूज केसनुसार 10-120Hz रिफ्रेश रेटवर चालू शकतो.
Apple चं असं म्हणणं आहे की, iPhone Air आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन आहे, ज्याची थिकनेस 5.6mm आहे. हे 80 टक्के रिसाइकल्ड केलेल्या टायटॅनियम मटेरियलपासून बनवले आहे. यामध्ये पहिल्यांदाच सिरेमिक शील्ड 2 फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला देण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे iPhone Air पूर्वीपेक्षा चार पट जास्त क्रॅक रेजिस्टेंट बनतो.
iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
iPhone Air हा सिरीजमधील Pro मॉडल्सप्रमाणेच A19 Pro प्रोसेसरवर आधारित आहे, ज्यामध्ये सहा-कोर CPU, सहा-कोर GPU आणि 16-कोर न्यूरल लर्निंग समाविष्ट आहे. यात दुसऱ्या पिढीचे डायनॅमिक कॅशिंग आहे, जे चांगले मॅथ रेट्स आणि यूनिफाइड इमेज कंप्रेशन देते. फोन Apple Intelligence वैशिष्ट्यांना देखील समर्थन देतो. याशिवाय या पातळ आयफोनमध्ये Apple चे नवीन N1 चिप देण्यात आले आहे, जे Wi-Fi 6, Bluetooth 6 आणि Thread ला पॉवर देते. यासोबतच या पातळ आयफोनमध्ये नवीन C1X मॉडेम आहे, जो iPhone 16e च्या C1 मॉडेमपेक्षा दुप्पट वेगवान नेटवर्किंग गती आणि अधिक कार्यक्षमता देते.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर iPhone Air मध्ये 48-मेगापिक्सेलचा Fusion मेन कॅमेरा देण्यात आला आहे, जो दूसऱ्या हँडसेट्ससाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये सेंसर-शिफ्ट OIS, f/1.6 अपर्चर आणि 2X टेलीफोटो कॅपेबिलिटी आहे. फ्रंटला 18-मेगापिक्सेलचा Centre Stage कॅमेरा देण्यात आला आहे, जसा iPhone 17 मॉडल्समध्ये आहे. Apple ने iPhone Air च्या बॅटरी स्पेसिफिकेशनचा खुलासा केलेला नाही पण एकदा चार्ज केल्यावर 27 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅकसह ‘संपूर्ण दिवस बॅटरी लाइफ’ देणारा हा फोन असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा हँडसेट फक्त 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो.