IRCTC बंद करणार या युजर्सचे अकाऊंट; पुढचा नंबर तुमचा तर नाही ना... तात्काळ करा हे काम
तुम्ही देखील IRCTC युजर आहात का? तुम्ही तुमच्या प्रवासाची तिकीट IRCTC च्या मदतीने बुक करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने बनावट तिकीट बुकींग रोखण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय रेल्वेने AI टेक्नॉलॉजीचा वापर करून गेल्या 6 महिन्यांत सुमारे 2.4 करोड अकाउंट बॅन केले आहेत. बनावट तिकिट बुकिंग आणि अन्य घोटाळे रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही देखील अशा घोटाळ्यांमध्ये सहभागी असाल तर आत्ताच थांबा, अन्यथा तुमचे IRCTC अकाऊंट देखील बंद केले जाऊ शकते.
खरं तर, हल्ली इंटरनेटवर असे अनेक टूल्स उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज तिकीट बुक करु शकता. हाच सर्व घोटाळा रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने अशा हजारो युजर्सना ट्रॅक केलं आहे, जे या बॉट आणि ऑटोमेटिक टूल्सचा वापर करून तात्काळ आणि प्रीमियम तात्काळ तिकीट बुक करत आहेत. याच कारणामुळे सर्वसामान्य लोकांना तिकीट बुक करण्यात अडचण येते. याच सर्व गोष्टीचा विचार करता आता भारतीय रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतीय रेल्वेने या बनावट अकाऊंटची ओळख पटावी यासाठी AI मॉनिटरिंग सिस्टम डेवलप केलं आहे. हे AI सिस्टीम आधार व्हेरिफिकेशन नसलेलं अकाउंट्स स्कॅन करत आहे. अशी माहिती मिळाली आहे की, सध्या IRCTC चे 13 करोड यूजर्स आहेत, ज्यामध्ये केवळ 1.2 करोड़ अकाऊंट आधार व्हेरिफाइड आहेत. ज्या युजर्सनी त्यांचं अकाउंट आधार व्हेरिफाइड केलं नाही त्याचं अकाऊंट धोक्यात आहे. अशा युजर्सच अकाऊंट कधीही ब्लॉक केलं जाऊ शकतं. जर अकाऊंट ब्लॉक होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं अकाऊंट लवकरात लवकर आधार व्हेरिफाइड करा.
खरं तर भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग सुरक्षित व्हावी यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. तात्काळ बुकिंगदरम्यान आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलं आहे. ज्या युजर्सनी त्यांचं अकाऊंट आधार व्हेरिफाइड केलं असेल अशा युजर्सना आता तिकीट बुकिंगसाठी 10 मिनिट एक्स्ट्रा देण्यात येणार आहेत. यावेळ ऑथराइज्ड एजेंट देखील तिकीट बुक करु शकणार नाहीत. भारतीय रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्स आता सुरक्षितपण तिकीट बुक करु शकणार आहेत आणि यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता देखील वाढली आहे.