Huawei दुसरा ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत, टिप्स्टरने शेअर केले अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
सप्टेंबर 2024 मध्ये Huawei Mate XT Ultimate Design लाँच करण्यात आला होता. हा जगातील पहिला कमर्शियल ट्रिपल-स्क्रीन फोल्डफोन आहे. Huawei ने पहिला ट्रिपल फोल्ड फोन लाँच करून एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. या स्मार्टफोनने सर्वांना वेड लावलं होतं. स्मार्टफोनचा लूक, त्याची डिझाईन, त्याचे सर्वच फीचर्स कमाल होते.
Huawei Mate XT Ultimate Design या हँडसेटमध्ये 6.4-इंच कवर स्क्रीन (एक बार फोल्ड केल्यानंतर) आणि 10.2-इंच टॅबलेट स्क्रीन (दोनवेळा अनफोल्ड केल्यानंतर) देण्यात आली आहे. हा फोन यावर्षी काही ग्लोबल मार्केट्समध्ये देखील लाँच करण्यात आला होता. चीनी स्मार्टफोन ब्रँड आता Huawei Mate XT 2 वर काम करत आहे. हा कंपनीचा दुसरा ट्राय-फोल्ड स्मार्टफोन असणार आहे. एक टिप्स्टरने Huawei Mate XT 2 बाबत काही माहिती देखील शेअर केली आहे. यानुसार, 2025 च्या अखेरपर्यंत हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Weibo पर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनने दावा केला आहे की, Huawei यावर्षी दुसरा आणि नवीन ट्राय-फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार आहे. या मॉडेलमध्ये ओरिजिनल Mate XT Ultimate Design सारखी स्क्रीन रेजोल्यूशन दिलं जाण्याची शक्यता आहे. आगामी डिव्हाईसचं नाव कदाचित Huawei Mate XT 2 असू शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये नवीन चिपसेट, कॅमेरा अपग्रेड्स आणि दुसरे हार्डवेयर इंप्रूवमेंट्स दिले जाणार आहेत.
लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, Huawei Mate XT 2 मध्ये Kirin 9020 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. अशी आशा आहे की, Mate XT Ultimate Design मध्ये वापरल्या जाणाऱ्या Kirin 9010 चिपसेटपेक्षा हा प्रोसेसर खूपच चांगला असू शकतो. दुसऱ्या ट्रिपल फोल्डेबल फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील अद्याप अधिकृतपणे शेअर करण्यात आली नाही.
Huawei Mate XT Ultimate Design स्मार्टफोन सप्टेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 19,999 म्हणजेच सुमारे 2,35,900 रुपये ठेवण्यात आली होती. हा स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात काही ग्लोबल मार्केट्समध्ये देखील लाँच करण्यात आला होता.
Huawei Mate XT Ultimate Design मध्ये HarmonyOS 4.2 आहे. यामध्ये 10.2-इंच फ्लेक्सिबल LTPO OLED मेन स्क्रीन देण्यात आली आहे. एकवेळा फोल्ड केल्यानंतर 7.9-इंच डिस्प्ले आणि दुसऱ्यांदा फोल्ड केल्यानंतर 6.4-इंच डिस्प्ले या फोनमध्ये आहे. यात ट्रिपल-कॅमेरा सेटअप आणि 5,600mAh बॅटरी आहे जी 66W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.