Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही

वेस्ट वर्जीनिया यूनिवर्सिटीमध्ये साइबरसिक्योरिटीचे असिस्टेंट प्रोफेसर क्रिस्टोफर रमजान यांनी रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या AI बाबत काही खुलासे केले आहेत. AI कसा धोकादायक आहे, याबाबत त्यांनी सांगितलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2025 | 12:17 PM
AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही

AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या डिजिटल काळात AI आपल्या जीवनाच महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या स्मार्टवॉचमध्ये आणि स्मार्टफोनमध्ये अनेक AI चॅटबोटचा समावेश असतो. हे AI आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मदत करतो. आपण आपल्या रोजच्या जीवनात ChatGPT किंवा Microsoft Copilot सारख्या AI असिस्टेंटचा वापर करतो. हे AI असिस्टेंट आपल्याला अगदी सहज आपल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात.

Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?

सध्या असे अनेक लोकं आहेत जे त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी AI असिस्टेंटवर अवलंबून असतात. सर्वांच्या फायद्याचा असणाऱ्या या AI असिस्टेंटबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे AI असिस्टेंट युजर्सची माहिती चोरतो. वेस्ट वर्जीनिया यूनिवर्सिटीमध्ये साइबरसिक्योरिटीचे असिस्टेंट प्रोफेसर क्रिस्टोफर रमजान यांनी याबाबत रिसर्च केला आहे. त्यांच्या या रिसर्चमध्ये AI सिस्टम कशा प्रकारे आपली वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत, आणि आपण कशा प्रकारे या सर्वांपासून आपली सुरक्षा करू शकतो, याबाबत माहिती देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Google Gemini)

अशा प्रकारे AI चोरतात तुमची माहिती?

क्रिस्टोफर यांनी सांगितलं आहे की, जनरेटिव AI जसे की ChatGPT आणि Google Gemini तुम्ही जे काही लिहीता, जसं की तुमचे प्रश्न किंवा सल्ला हे सर्व रेकॉर्ड करून स्टोअर केले जातं. याचा वापर संबंधित AI मॉडेलला अधिक चांगला बनवण्यासाठी केला जातो. जरी OpenAI सारखे काही AI प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रशिक्षणासाठी डेटा न वापरण्याचा पर्याय देतात, पण तरीही तुम्ही इनपुट केलेली माहिती स्टोअर केली जाते. अनेक कंपन्या तुमचा डेटा निनावी करण्याचा दावा करतात. जरी असं केलं तरी देखील निनावी केलेल्या डेटा युजरचा शोध देखील लावला जाऊ शकतो. त्यामुळे AI चा वापर करताना आपली माहिती चोरली जाण्याचा धोका कायम असतो?

AI आणि सोशल मीडिया

जनरेटिव्ह AI व्यतिरिक्त, आपण दिवसभर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करतो. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक यांचा समावेश आहे. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमच्या वर्तनाचे सतत विश्लेषण करतात. प्रत्येक पोस्ट, फोटो, व्हिडिओ, लाईक, शेअर, कमेंट आणि तुम्ही किती वेळ एखाद्या गोष्टीकडे पाहिले या सर्व गोष्टींचा वापर करून एआय सिस्टम तुमचे डिजिटल प्रोफाइल तयार करू शकते. स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर्स आणि होम स्पीकर सारखी स्मार्ट डिव्हाईस बायोमेट्रिक डेटा, व्हॉइस रेकग्निशन आणि लोकेशन ट्रॅकिंगमधून सतत डेटा गोळा करतात.

तुमची प्रायव्हसी धोक्यात आली आहे का?

क्रिस्टोफर यांनी सांगितलं आहे की, AI टूल्सचा डेटा क्लाउडमध्ये स्टोअर केला जातो. याचा अर्थ कोणतेही थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म हा डेटा अ‍ॅक्सेस करू शकतो. स्मार्टवॉच किंवा व्हॉइस डिव्हाइसेसमध्ये जी माहिती रेकॉर्ड केली जाते ती माहिती AI अल्गोरिदममध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा युजर्सचे प्रोफाइल तयार करण्यासाठी वापरली जाते.

Father’s Day 2025: फक्त स्मार्टवॉच नाही, यंदा फादर्स डे वडीलांना गिफ्ट करा त्यांचा हेल्थ पार्टनर! किंमत 2500 हजारांहून कमी

याशिवाय युजर्सना माहिती नसते की कोणता डेटा गोळा केला जात आहे आणि त्याचा वापर कसा केला जात आहे. अनेक कंपन्या कठिण भाषेत गोपनीयता धोरणे तयार करतात, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्याबाबत माहिती मिळणं कठीण होतं. एका अहवालानुसार, सरासरी लोक टर्म्स ऑफ सर्विस फक्त 73 सेकंदात वाचतात आणि त्यावर सहमती देतात. पण जर या सर्व अटी नीट वाचल्या आणि समजून घेतल्या तर त्यासाठी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

अशी घ्या तुमची काळजी

  • एआय टूल्समध्ये कधीही नाव, जन्मतारीख, पत्ता, आधार/पॅन क्रमांक इत्यादी वैयक्तिक माहिती प्रविष्ट करू नका.
  • ऑफिसमध्ये एआय वापरताना, ट्रेड सीक्रेट किंवा क्लायंट डेटा यासारखी गोपनीय माहिती शेअर करू नका.
  • गरज नसताना स्मार्ट डिव्हाइस बंद करा.

Web Title: Is ai stealing data from your phone how it is dangerous for users know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर
2

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
3

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
4

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.