Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?
लोकप्रिय आणि जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असणारी सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन भारतात Samsung Galaxy M36 या नावाने लाँच केला जाणार आहे. सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार, याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र लवकरच या स्मार्टफोनची भारतात एंट्री होण्याची शक्यता आहे.
आगामी स्मार्टफोनचा टीझर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर शेअर करण्यात आला आहे. या टिझरमध्ये आगामी स्मार्टफोनची डिझाईन आणि कॅमेरा मॉड्यूलची झलक पाहायला मिळत आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली नाही. मात्र स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच त्याचे काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. चला तर मग कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy M36 स्मार्टफोनच्या इंडिया लाँचिंगचा टिझर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर शेअर करण्यत आला आहे. टीझर फोटोमध्ये कंपनीने Monster AIcon असं लिहीलं आहे. यामुळे असं अंदाज लावला जाऊ शकतो की, सॅमसंगचा हा बजेट फोन एआय फीचर्ससह लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे.
Samsung Galaxy M36 5G launching in India soon#Samsung #GalaxyM365G pic.twitter.com/dadg2C0cmr
— Prathap G (@prathapgtech) June 13, 2025
Samsung Galaxy M36 स्मार्टफोन गीकबेंचच्या लिस्टिंगमध्ये स्पॉट झाला आहे. हा फोन कंपनीच्या Exynos 1380 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने Galaxy M35 मध्ये देखील हीच चिपसेट दिली होती. सॅमसंगचा फोन बजेट मिडरेंजमध्ये लाँच केला जाणार आहे. अपग्रेड्सबद्दल बोलायचं झालं तर Galaxy M36 मधील AI फीचर या फोनचे हाइलाइट्स असणार आहेत. Geekbench परफॉर्मेंसबद्दल बोलायचं झालं तर Galaxy M36 ने सिंगल कोर टेस्टमध्ये 1004 पॉइंट्स आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2886 पॉइंट्स मिळवले आहेत. अपकमिंग Galaxy M36 स्मार्टफोन 6GB रॅम आणि Android 15 वर आधारित One UI 7 वर चालणार आहे. सध्या या Samsung फोनबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. मात्र लवकरच कंपनी आगामी स्मार्टफोनबद्दल काही अपडेट्स शेअर करेल अशी अपेक्षा आहे.
Galaxy M36 स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy M35 ला रिप्लेस करणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीने जुलै 2024 मध्ये लाँच केला होता. हा फोन 19999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आला होता. नवीन गॅलेक्सी M36 स्मार्टफोन 20 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये देखील आणला जाऊ शकतो.