itel A50 चे फिचर्स घ्या जाणून
बाजारात एकापेक्षा एक मोबाईल फोन असून त्याच्या किमतीमध्येदेखील एक स्पर्धा असते. याशिवाय वेगवेगळे फिचर्सही फोनमध्ये असतात. नुकताच पोकोला टक्कर देण्यासाठी itel A50 बाजारात आला असून या फोन्सचे खास फीचर्स आपण जाणून घेऊ.
डिझाइन आणि डिस्प्ले:
itel A50 हा केवळ एक स्मार्टफोन असून सोबतच स्टाईलमध्येही जबरदस्त आहे. itel लोकप्रिय A50 लाइनअपचा लेटेस्ट फोन असून नवीन रंगांत येत आहे. ते म्हणजे सँडी अंबर आणि इंक ग्रीन. हे खास रंग डिव्हाइसला एक प्रीमियम, लक्षवेधी लूक देतात जे बजेट श्रेणीमध्ये दुर्मिळ आहे. दुसरा बजेट फोन पोको सी६१ अधिक पारंपारिक डिझाइनमध्ये असून यामुळे आयटेल ए५०आणखी खास आहे.
दोन्ही डिव्हाइसेसचा विचार केल्यास ६.६-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, जो मल्टीमीडिया वापरासाठी इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव देतो. तसंच आयटेल ए५० मध्ये डायनॅमिक बार आहे जो नोटीफिकेशन पाहण्यासाठी अधिक सोयीस्कर आहे.
कशी आहे itel A50 ची कामगिरी
आयटेल ए५० हा दररोजच्या कामगिरीसाठी अगदी बेस्ट आहे. यात ऑक्टा कोर प्रोसेसरद्वारे ४ जीबी रॅम (व्हर्च्युअल रॅमसह १२ जीबी पर्यंत) असल्याने ए५० मल्टीटास्किंग करण्यासाठी दमदार आहे. तसंच पोको सी६१ ४ जीबी रॅम सह ८ जीबी पर्यंत वाढवता येतो. तसंच itel A50 मध्ये Android 14 (Go Edition) आहे.
धमाकेदार बॅटरीसह लाँच झाला Vivo V50, अनेक AI वैशिष्ट्यांसह सुसज्ज; किंमतही परवडण्याजोगी
कसा आहे कॅमेरा?
फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी itel A50 आणखी बेस्ट आहे. कारण यात प्रगत इमेजिंग अल्गोरिदमसह 8MP AI ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, जो कमी प्रकाशाच्या स्थितीतही स्पष्ट आणि क्लिअर फोटो देतो. तसंच समोर, itel A50 चा 5MP सेल्फी कॅमेरा तुम्हाला व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियावर बेस्ट सेल्फी अपलोड करण्यास मदत करतो.
itel A50 वर विशेष ऑफर
itel A50 च्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ग्राहकांच्या समाधानासाठी itel १०० दिवसांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देत आहे. याव्यतिरिक्त, itel A50 मजबूत फ्रेम आणि स्क्रॅच-प्रतिरोधक मटेरियलने बनवले आहे, जे दैनंदिन वापरासाठी फोनला अधिक टिकाऊ बनवते.
बॅटरी लाइफ आणि चार्जिंग
itel A50 आणि Poco C61 दोन्हीमध्ये ५०००mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी एका चार्जवर संपूर्ण दिवस वापर प्रदान करते. तथापि, itel A50 चे पॉवर ऑप्टिमायझेशन सॉफ्टवेअर बॅटरीचे आयुष्य वाढवते, ज्यामुळे तुम्ही वारंवार रिचार्ज न करता कनेक्टेड राहता.
किंमत
itel A50 फक्त ६०९९ रुपयांपासून सुरू होते (३GB व्हेरिएंटसाठी) तर ४GB व्हेरिएंट फक्त ६४९९ रुपयांच्या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे. यामुळे बाजारात कमी वेळात याला जास्त मागणी मिळेल अशी अपेक्षा आहे. अत्यंत कमी किमतीत आणि आकर्षक फिचर्ससह हा मोबाईल असल्यामुळे आता याची मागणी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे