Apple युजर्सची मजाच मजा! जुन्या मॉडेल्समध्ये मिळणार iPhone 16 सीरीजचं 'हे' कमाल फीचर, जाणून घ्या सविस्तर
टेक जायंट कंपनी अॅपल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने गेल्या वर्षी 2024 मध्ये iPhone 16 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने अनेक नवीन आणि अपग्रेड फीचर्स दिले, ज्यामुळे युजर्सचा अनुभव आणखी चांगला बनला. आयफोन 16 सिरीजचे सर्वच फीचर्स लोकप्रिय आहेत. यापैकीच एक फीचर म्हणजे अॅपलचे व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर. व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचरला युजर्सनी प्रचंड लोकप्रियता दर्शवली होती. व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचरची वाढती लोकप्रियता पाहून आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Apple iPhone: नवीन iPhone लाँच होताच Apple ने बंद केले ‘हे’ तीन मॉडेल्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर
कंपनीने आयफोन 16 सिरीजचे व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर आता जुन्या मॉडेल्ससाठी देखील रोल आऊट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अॅपलने आयफोन युजर्सना आनंदित केले आहे. कंपनीने जाहीर केले आहे की आता आयफोन 16 सिरीजमधील व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स सारख्या जुन्या मॉडेल्समध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता ज्या युजर्सकडे आयफोनचं जुनं मॉडेल आहे ते देखील या व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचरचा आनंद घेऊ शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी सॉफ्टवेअर अपडेटमध्ये हे फीचर रोल आऊट केलं जाऊ शकतं. त्यामुळे येणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेटनंतर युजर्स याचा आनंद घेऊ शकतील. आतापर्यंत हे फीचर फक्त आयफोन 16 सिरीजमधील डिव्हाईसमध्ये उपलब्ध आहे. आता त्याची व्याप्ती वाढवली जात आहे. त्यामुळे आता हे फीचर जुन्या मॉडेल्ससाठी देखील रोल आऊट केलं जाणार आहे.
या फीचरच्या मदतीने, युजर्स कॅमेरा फोकस करून कोणत्याही वस्तू किंवा मजकुराची माहिती मिळवू शकतात. ते ऑब्जेक्टबद्दलची सर्व माहिती दाखवू शकते आणि युजर्स मजकूराचे भाषांतर देखील करू शकतात. याशिवाय, ते पुस्तकांचे सारांश सादर करणे, कुत्र्यांच्या जाती ओळखणे इत्यादी कामे देखील करू शकते. हे कोणत्याही परदेशी भाषेचे भाषांतर करू शकते आणि यासाठी युजर्सना इतर कोणत्याही अॅपवर जाण्याची आवश्यकता नाही. त्याची सर्च कॅपिसिटी वाढवण्यासाठी, त्यात गुगल आणि चॅटजीपीटी एकत्रित करण्यात आले आहेत.
आयफोन 15 प्रो युजर्स अॅक्शन बटण किंवा कंट्रोल सेंटरमधून हे वैशिष्ट्य अॅक्सेस करू शकतील. कंपनीने आयफोन 16 मध्येही हे फीचर दिले आहे आणि यामध्येही युजर्स कॅमेरा बटणाशिवाय त्याचा फायदा घेऊ शकतील. आयफोन 16 सिरीजमध्ये कॅमेरा वापरण्यासाठी एक डेडिकेटेड बटण आहे. आयफोन 15 प्रो वापरकर्त्यांनाही हे वैशिष्ट्य रोल आऊट केल्याने हे दिसून येते की व्हिज्युअल इंटेलिजेंसमध्ये प्रवेश करण्यासाठी डेडिकेटेड कॅमेरा बटणाची आवश्यकता नाही.
अॅपलने अद्याप जुन्या युजर्ससाठी हे फीचर कधी आणले जाईल याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु असे मानले जाते की ते iOS 18.4 अपडेटसह आणले जाऊ शकते. हे अपडेट एप्रिलमध्ये येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आयफोन 15 प्रो युजर्सना या फीचरसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.