JBL ने लाँच केला ब्लूटूथ स्पीकर; जबरदस्त फीचर्सही मिळणार
नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक जेबीएलने आपला नवीन जेबीएल ग्रिप अल्ट्रा-पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर लाँच केला आहे. हा स्पीकर विशेषतः सहज वाहून नेण्यासाठी आणि घराबाहेर वापरण्यासाठी डिझाइन केला आहे. हा स्पीकर लहान आकारातही दमदार आवाज देण्यासाठी डिझाइन केला आहे. यात १६८ आउटपुटसह जेबीएल प्रो साउंडची सुविधा आहे.
या स्पीकरमध्ये एआय साउंड बूस्ट टेक्नॉलॉजी देखील आहे, जी रिअल-टाइममध्ये संगीताचे विश्लेषण करते आणि स्पीकर ड्रायव्हरला ऑप्टिमाइझ करते, ज्यामुळे जास्त आवाजातही डिस्टॉर्शन कमी होते आणि बेस वाढतो. युजर स्टिरिओ साउंडसाठी दोन स्पीकर जोडू शकतात. याचे डिझाइन कॉम्पॅक्ट आहे. स्पीकरच्या मागील बाजूस एक दोरीचा लूप दिला आहे, ज्यामुळे तो बेंग किंवा हुकवर सहज टांगता येतो. मागील पॅनलवर एक अॅम्बियंट लाईट देखील आहे, ज्याचा रंग आणि ब्राइटनेस वापरकर्ते JBL पोर्टेबल अॅपद्वारे त्यांच्या आवडीनुसार अॅडजस्ट करू शकतात.
एका चार्जवर हा स्पीकर अंदाजे १२ तास संगीत प्लेबॅक देऊ शकतो. प्लेटाइम बूस्ट फीचर चालू केल्यास अंदाजे २ तासांचा अतिरिक्त प्लेबैंक मिळतो. हे फीचर स्पीकरची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे मोठा आणि अधिक स्पष्ट आवाज मिळतो.
स्पीकरला IP68 रेटिंग दिले आहे, ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. कंपनीच्या मते, याची रचना ड्रॉप प्रोटेक्शनसह देखील केली आहे. शिवाय, हा स्पीकर वापरलेल्या प्लास्टिकपासून पुनर्वापर करून बनवला आहे आणि पॅकेजिंगसाठी FSC-प्रमाणित कागद वापरला आहे.
नवीन ओवर-ईयर हेडफोन्स लाँच
भारतात नथिंगचे नवीन ओवर-ईयर हेडफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे नवीन हेडफोन्स नथिंग हेडफोन 1 या नावाने लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे ओवर-ईयर हेडफोन लाँच केले आहेत. या हेडफोनची डिझाईन इतर हेडफोनपेक्षा वेगळी आणि आकर्षक आहे. या हेडफोनची विशेष गोष्ट म्हणजे या हेडफोनची बॅटरी.






