भारतीयांचं ‘आवडतं नेटवर्क’ कोणतं? Jio, Airtel की Vi? अहवाल वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
भारतात जिओ, एअरटेल आणि व्हि या खाजगी टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल नेहमीच सज्ज असते. भारतातील स्मार्टफोन युजर्सची वाढती संख्या लक्षात घेता टेलिकॉम कंपन्या देखील आपले युजर्स वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवीन युजर्स आकर्षिक करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सतत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. याशिवाय अनेक टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी काही विशेष ऑफर्स देखील घेऊन येत असतात. यामुळे भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये सतत स्पर्धा सुरु असते. या स्पर्धेत 2025 मध्ये कोणत्या कंपनीने आघाडी घेतली आहे, जाणून घेऊ.
लोकप्रिय टेलिकॉम कंपनी पुन्हा एकदा नंबर वन ठरली आहे. इंडस्ट्री रिपोर्टनुसार, जिओ पुन्हा एकदा 2025 मध्ये सर्वात मोठी सर्वाधिक युजर्स असलेली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिओचा एकूण मार्केट शेअर सुमारे 39% आहे. यानंतर Airtel सुमारे 33% इक्विटीसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर व्हि आणि बीएसएनएलची अवस्था अत्यंत वाईट आहे. याचं कारण म्हणजे दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क कवरेज आणि 5G सर्विसचा अभाव. व्हि आणि बीएसएनएल युजर्स सतत त्यांच्या नेटवर्कबाबत तक्रार करत असतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या यशामागे अनेक कारणं आहेत. यातील एक सर्वात मोठं कारण म्हणजे परवडणारे डेटा प्लान, मजबूत नेटवर्क कवरेज आणि वेगवान 5G सर्विस आहे. ज्या भागांत व्हि आणि बीएसएनएल युजर्स सतत नेटवर्कबाबत तक्रार करत असतात अशा ठिकाणी जिओ युजर्स वेगवान 5G सर्विसचा आनंद घेत असतात. जिओसोबतच Airtel देखील त्यांच्या प्रीमियम यूजर्सना अधिक चांगली नेटवर्क सर्विस देण्यासाठी प्रयत्न करत असते. मात्र तरी देखील कंपनीच्या रणनितीमुळे जिओ नेहमीच आघाडीवर असते.
बीएसएनएल सध्या 4G नेटवर्क चालवत आहे आणि 2026 पर्यंत 5G सेवा सुरू करण्याची अपेक्षा आहे. कंपनीने अद्याप नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर सुविधा मजबूत न केल्यामुळे व्हीआय (व्होडाफोन आयडिया) सतत यूजर्स गमावत आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या युजर्सना सतत नेटवर्कचा सामना करावा लागतो.
एकूणच भारताच्या टेलीकॉम सेक्टरमध्ये 2025 मध्ये देखील जिओचा दबदबा कायम आहे आणि येणाऱ्या काही वर्षांत कंपनी 6G ट्रायल देखील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे इतर कंपन्यांची झोप उडाली आहे. जिओच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इतर कंपन्यांसाठी एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे. तसेच जिओच्या या वाढत्या प्रयत्नांमुळे भारतातील डिजिटल क्रांतिला एक नवीन दिशा मिळली आहे.