Tech Tips: जुना स्मार्टफोन विकण्यापूर्वी करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा होईल तुमचं मोठं नुकसान
तुमचा जुना स्मार्टफोन विकण्यापूर्वी फोनमधील सर्व फाईल्स डिलीट करा आणि फॅक्ट्री रीसेट करा, ज्यामुळे फोनमधील सर्व डेटा डिलीट केला जाणार आहे.
तुमता जुना फोन विकण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला देण्यापूर्वी तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स आणि फोटोंचा बॅकअप घ्या.
फोनमधील महत्त्वाच्या फाईल्स आणि फोटोंचा बॅकअप घेतल्यानंतर गुगल अकाऊंटसह फोनमधून इतर सर्व अकाऊंट लॉगआउट करा.
जर तुमचा फोन अँड्रॉइड लॉलीपॉप (5.0) किंवा त्यावरील आवृत्तीवर चालत असेल, तर त्यात फॅक्टरी रीसेट प्रोटेक्शन (एफआरपी) असेल. ते काढून टाकणे महत्त्वाचे आहे कारण त्याशिवाय, नवीन यूजर डिव्हाइस वापरू शकणार नाही.
फॅक्ट्रि रिसेट करण्यापूर्वी तुमच्या फोनमध्ये मोठ्या फाईल्स डाऊनलोड करा, जसे गाणी, चित्रपट, इत्यादी. पुढच्या वेळी तुम्ही ते रीसेट कराल तेव्हा, नवीन डेटा जुन्या फाइल्सवर ओव्हरराईट होईल. याचा अर्थ असा की जर कोणी डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फक्त निरुपयोगी फाइल्स सापडतील, तुमची वैयक्तिक माहिती नाही.