
Free Fire Max: प्लेअर्ससाठी Garena ने जारी केले आजचे कोड्स, मोफत डायमंड्स आणि गन स्किन मिळवायची उत्तम संधी
फ्री फायर मॅक्समध्ये 17 ऑक्टोबरपासून Free Evo Access ईव्हेंट सुरु होणर आहे. नावावरून समजतं आहे की, या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स Evo Access पास फ्रीमध्ये जिंकू शकणार आहेत. खरं तर इतर दिवशी हा पास खरेदी करावा लागतो. मात्र ईव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर डायमंड खर्च न करता Evo Access पास जिंकण्याची संधी उपलब्ध असते. हा ईव्हेंट गेममधील इतर ईव्हेंटपेक्षा वेगळा असणार आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी खर्च करावी लागणार नाही. तुम्हाला ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. जसंजसं तुम्ही टास्क पूर्ण कराल, त्याप्रमाणे तुम्हाला ईव्हेंचमध्ये नवीन रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.