Samsung TriFold Smartphone: लक्झरीचा नवीन ट्रेंड! तीन बॅटरीसह लाँच होऊ शकतो हा स्मार्टफोन, डिटेल्स झाले लीक
Samsung च्या आगामी नव्या स्मार्टफोनची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, Samsung चा नवीन TriFold स्मार्टफोन 2025 मध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र अलीकडेच दाखल केलेल्या पेटंटनुसार या डिव्हाईसच्या डिझाईनबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा फोन Samsung Galaxy Z TriFold या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये G-स्टाइल इनवर्ड फोल्डिंग मॅकेनिज्म दिला जाणार आहे.
पूर्णपणे उघडल्यानंतर या स्मार्टफोनची स्क्रीन 9.96 इंच होणार आहे. फोनमध्ये तीन जोडलेले पॅनल्स दिले जाणार आहेत, ज्यातील प्रत्येकामध्ये एक वेगळी स्वतंत्र बॅटरी दिली जाणार आहे. याशिवाय कॅमेरा पॅनलमध्ये सर्वात छोटी बॅटरी दिली जाणार आहे, कारण कॅमेरा मॉड्यूल तिथे खूप जागा घेतो. या स्मार्टफोनच्या बॅटरीची आता प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. हा आगामी स्मार्टफोन कधी लाँच होणार आणि त्याचे इतर स्पेसिफिकेशन्स कोणते आहेत, याबाबत अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy Z TriFold चा पेटेंट KIPRIS (Korea Intellectual Property Rights Information Service) वर दिसला आहे. पेटंटचे रेखाचित्र बाहेरून Galaxy Z Fold 7 सारखे दिसत आहे, परंतु अंतर्गत डिझाइन पूर्णपणे वेगळे आहे. फोनमध्ये तीन बॅटरी असतील असं सांगितलं जात आहे. प्रत्येक पॅनेलमध्ये एक बॅटरी दिली जाणार आहे. बॅटरी रिबन केबल्सने जोडल्या जातील. बॅटरीचा आकार पहिल्यापासून तिसऱ्यापर्यंत वाढेल, ज्यामुळे एकूण बॅटरी क्षमता विद्यमान फोल्डेबलपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. ही सर्व माहिती लीक झालेल्या फीचर्सच्या आधारावर देण्यात आली आहे.
कॅमेऱ्यावाल्या पॅनलमध्ये सर्वात छोटी बॅटरी दिली जाणार आहे. तर तिसऱ्या पॅनलमध्ये सर्वात मोठी बॅटरी दिली जाणार आहे. पेटेंटमध्ये बॅटीरीची वास्तविक क्षमता सांगितलेली नाही. मात्र असा अंदाज लावला जात आहे की, या फोनमध्ये Galaxy Z Fold 7 च्या 4,400mAh बॅटरीपेक्षा मोठी बॅटरी दिली जाणार आहे. ट्रायफोल्डचा मोठा डिस्प्ले जास्त बॅटरी वापरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Samsung शक्यतो APEC (Asia-Pacific Economic Cooperation) समिटमध्ये Galaxy Z TriFold सादर करण्याची शक्यता आहे. हा ईव्हेंट 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत Gyeongju, South Korea मध्ये आयोजित केला जाणार आहे. सुरुवातीला या डिव्हाईसचे 50,000 यूनिट्स लाँच केले जाणार आहे आणि फोन आधी केवळ साऊथ कोरिआ आणि चीनमध्ये उपलब्ध असणार आहे.
याशिवाय या स्मार्टफोनचे काही फीचर्स देखील ऑनलाईन लीक झाले आहे. या स्मार्टफोनमध्ये 9.96 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर देखील दिला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये सिलिकॉन-कार्बन आधारित बॅटरी देखील असण्याची शक्यता आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी सेंसर दिला जाण्याची शक्यता आहे.