Jio आणि Airtel यूजर्स... Panchayat Season 4 फ्रीमध्ये बघायचाय? हा जुगाड तुमच्यासाठी आहे बेस्ट
वेब सिरीज पंचायतच्या 3 लोकप्रिय सिझननंतर सर्वचजण चौथ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. तुम्ही देखील पंचायत सिझन 4 ची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पंचायत सिझन 4 अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे. पण तुम्हाला पंचायत सिझन 4 पाहायचा असेल तर तुमच्याकडे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे.
तुमच्याकडे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन नसेल तरी देखील तुम्ही पंचायत सिझन 4 पाहू शकणार आहात. होय, पंचायत सिझन 4 पाहण्यासाठी तुम्हाला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची गरज नाही. तुम्हाला रिचार्ज प्लॅनसोबत अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio आणि Airtel त्यांच्या युजर्सना काही निवडक रिचार्ज प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन ऑफर करत आहेत. म्हणजेच तुम्हाला रिचार्ज प्लॅनमध्ये डेटा फायद्यांसोबतच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन देखील ऑफर केलं जाणार आहे. तसेच तुम्हाला या रिचार्ज प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शनसाठी कोणतेही जास्तीचे पैसे देखील देण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
Airtel ने त्यांच्या काही प्रीपेड आणि ब्रॉडबँड प्लॅन्समध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. या प्लॅन्समध्ये 1199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणि 838 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा समावेश आहे.
1199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2.5GB डेटासह 84 दिवसांसाठी Amazon Prime सब्सक्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे.
838 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 56 दिवसांसाठी 3GB डेटासह Amazon Prime Lite सब्सक्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे.
ब्रॉडबँड यूजर्स: जर तुम्ही Airtel ब्रॉडबँड यूजर आहात आणि 999 किंवा त्याहून अधिक किंमतीचा प्लॅन तुम्ही खरेदी केला असेल, तर तुम्हाला फ्री Amazon Prime सब्सक्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. यासोबतच Disney+ Hotstar चा अॅक्सेस देखील मिळणार आहे.
Samsung ने भारतात लाँच केले 2025 बीस्पोक AI अप्लायन्सेस, वैशिष्ट्ये आणि फीचर्स जाणून घ्या
जिओ आपल्या यूजर्सना असे अनेक पर्याय देते, ज्यामध्ये अमेझॉन प्राइम सदस्यत्व समाविष्ट आहे. यासाठी युजर्सना कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.
JioFiber ब्रॉडबँड: ₹1299, ₹2499, ₹3999 आणि ₹8499 यांसारख्या ब्रॉडबँड प्लॅनप्रमाणे, वेगवेगळ्या इंटरनेट स्पीडसह, Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
1029 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: जर तुम्ही जिओचा हा प्रीपेड प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला Amazon Prime Lite चा अॅक्सेस मिळेल. म्हणजे पंचायत सीझन 4 पाहण्यात कोणताही अडथळा येणार नाही!