Samsung ने भारतात लाँच केले 2025 बीस्पोक AI अप्लायन्सेस, वैशिष्ट्ये आणि फीचर्स जाणून घ्या
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने २०२५ बीस्पोक एआय अप्लायन्स लाइनअप लाँच केली आहे. ही लाइनअप ईजी, केअर, सेव्ह आणि सेक्युअर या चार विशिष्ट ग्राहक फायद्यांवर डिझाइन करण्यात आली आहे. एआयसह तुमचे जीवन उत्साहवर्धक व आनंददायी व्हावे, हाच यामागील उद्देश आहे. या अनुभवांना सॅमसंगचे नवीन एआय होम स्क्रिन इंटरफेस, बिक्स्बी वॉईस असिस्टण्टसह द्विमार्गी नैसर्गिक कम्युनिकेशन, सॅमसंग नॉक्स सिक्युरिटी आणि विनासायास स्मार्टथिंग्ज कनेक्टीव्हीटीचे पाठबळ आहे.
ईजी: बीस्पोक एआय अप्लायन्सेस एआय व विनायासास कनेक्टीव्हीटीचा वापर करते. ज्यामुळे तुमचे टास्क्स सोपे होते. एआय होम, बिक्स्बी आणि स्मार्टथिंग्जच्या माध्यमातून तुमची दैनंदिन कामे आपोआप करतात. उदाहरणार्थ, एआय होम ऑटोमेटेड रूटिन्स, रिमोट कंट्रोल आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग देते. बिक्स्बी युजर्सना अप्लायन्सेसबाबत तपशीलवार प्रश्न विचारण्यास आणि नैसर्गिक, द्विमार्गी वॉईस कमांड्सचा वापर करत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देते. या सर्वासाठी फोन किंवा स्पीकरची देखील आवश्यकता नाही.
सेव्ह: बीस्पोक एआय अप्लायन्सेस ग्राहकांना ऊर्जा व वेळेची बचत करण्यास मदत करते. एआय एनर्जी मोड वीजेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. रेफ्रिजरेटर्समधील एआय व्हिजन इनसाइड खाद्यपदार्थ आणि त्यांच्या एक्स्पायरी तारखांवर देखरेख ठेवते. तसेच अपव्यय टाळण्यासाठी पाककलांबाबत सूचना देते. बीस्पोक एआय लॉण्ड्री कॉम्बो™ आणि टॉप लोड वॉशर्समधील एआय वॉश वैशिष्ट्ये कपड्यांवरील डाग आणि लोडनुसार चक्रांना ऑप्टिमाइज करतात, ज्यामुळे वेळ व पाण्याची बचत होते.
केअर: बिक्स्बी अप्लायन्स केअर व मेन्टेनन्स अलर्ट्ससह साह्य करते, तर स्मार्टथिंग्ज त्यांच्या कनेक्टेड थर्ड पार्टी डिवाईसेसच्या माध्यमातून युजर्सना कोणतीही हालचाल, धूर किंवा गळतीबाबत सूचना देते. बीस्पोक एआय सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह मन:शांती देते, ज्यामुळे कुटुंबांना घरापासून दूर असले तरी अप्लायन्सेस सुरक्षित असण्याची खात्री मिळते.
सेक्युअर: सॅमसंग नॉक्स अप्लायन्सेस व स्मार्टफोन्समधील दृश्यमान डॅशबोर्डसह बहुस्तरीय संरक्षण देते. पाच सॅमसंग उत्पादनांसह बीस्पोक एआय फॅमिली हब आणि बीस्पोक एआय लॉण्ड्री कॉम्बो यूएल सोल्यूशन्स आयओटी सिक्युरिटी रेटिंग्जकडून लेव्हल ‘डायमंड’सह सत्यापित करण्यात आली आहेत.
”आम्हाला भारतात २०२५ बीस्पोक एआय डिजिटल अप्लायन्सेस लाइन-अप लाँच करण्याचा आनंद होत आहे, जेथे नाविन्यता आणि उद्देशाला एकत्र करण्यात आले आहे. ही फक्त स्मार्ट अप्लायन्सेस नसून भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आलेली सर्वोत्तम सोबती आहेत,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्हणाले.
”आम्हाला विश्वास आहे की, आमचे बीस्पोक एआय अप्लायन्सेस भारतातील आधुनिक कुटुंबांच्या अप्लायन्सेस वापरामध्ये क्रांती घडवून आणतील, ज्यामुळे ग्राहक सर्वोत्तम स्मार्ट होम राहणीमानाचा अनुभव घेऊ शकतील,” असे सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेस बिझनेसचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्हणाले.
या नवीन लाँचमधील सर्वोत्तम अप्लायन्स आहे बीस्पोक एआय लॉण्ड्री कॉम्बो ऑल-इन-वन, जी घरातील जागा वाचवणारी, उच्च क्षमतेची, ऑल-इन-वन वॉशिंग मशिन आहे आणि एकाच युनिटमध्ये कपडे धुण्यासोबत सुकवले जातात. यामुळे मशिन्समध्ये कपडे पुन्हा पुन्हा टाकण्याचा त्रास दूर होतो, परिणामत: युजर्सचा वेळ वाचतो आणि कपडे धुतल्यानंतर कपड्यांना वास येत नाही. एआय वॉश अँड ड्राय असलेले बीस्पोक एआय लॉण्ड्री कॉम्बो लॉंण्ड्रीचे वजन, कपड्याचा प्रकार आणि कपड्यावरील डागांना ओळखते, आपोआपपणे प्रत्येक लोडसाठी पाणी, डिटर्जंट, वॉश टाइम आणि ड्राइंग स्थितींना समायोजित करते. यामधून कपडे उत्तमप्रकारे स्वच्छ धुतले जाण्याची आणि वैयक्तिकृत लॉण्ड्री अनुभवाची खात्री मिळते.
बीस्पोक एआय लॉण्ड्री कॉम्बोमध्ये प्रगत हीट पंप ड्राइंग तंत्रज्ञान आहे, जे गरम हवा रिसायकल करत कमी तापमानामध्ये सौम्यपणे व कार्यक्षमपणे कपडे सुकवते. हीट पंप सिस्टम उष्णता हस्तांतरणाला ऑप्टिमाइम करते आणि कपडे सुकण्याचा वेळ जवळपास ६० टक्क्यांनी व ऊर्जा वापर जवळपास ७५ टक्क्यांनी कमी करते, तसेच कपड्यांवर गोळे येणे व कपड्यांचे नुकसान होणे टाळते. सुपर स्पीड सायकलसह वापकरर्ते फक्त ९८ मिनिटांमध्ये कपडे धुवून सुकवू शकतात.
यामधील ७-इंच एआय होम एलसीडी डिस्प्ले वॉश चक्राची निवड, देखरेख व नियंत्रणासाठी सर्वोत्तम इंटरफेस देते, ज्यामधून वापरण्याच्या पद्धती व हंगामी सवयींवर आधारित वैयक्तिकृत सल्ले मिळतात. या डिस्प्लेवर ऊर्जा व पाणी वापराबाबत माहिती दिसते आणि मॅप व्ह्यूच्या माध्यमातून घरामध्ये कनेक्टेड अप्लायन्सेसचे संपूर्ण दृश्य दिसते. बीस्पोक एआय लॉण्ड्री कॉम्बो यूएल सोल्यूशन्सकडून लेव्हल ‘डायमंड’सह देखील सत्यापित आहे, ज्यामधून सॅमसंगची उद्योग-अग्रणी डिवाईस सुरक्षितता दिसून येते.
बीस्पोक एआय लॉण्ड्री कॉम्बो अपग्रेडेड बिक्स्बीसह येते, जे गुंतागूंतीच्या, संवादात्मक वॉईस कमांड्सना समजते. तसेच फ्लेक्स ऑटो डिस्पेन्स सिस्टम जवळपास ३२ लोड्ससाठी डिटर्जंट स्टोअर करू शकते, तर ऑटो ओपन डोअर वॉश चक्र संपल्यानंतर आपोआपपणे दमट हवा रीलीज करते, ज्यामुळे कपड्यांना वास येण्याला प्रतिबंध होतो आणि कपडे नवीन असल्यासारखे राहतात.
किंमत व उपलब्धता
सॅमसंगची २०२५ बीस्पोक एआय अप्लायन्सेस श्रेणी आता आघाडीच्या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल चॅनेल्ससह सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, Samsung.com आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. बीस्पोक एआय लॉण्ड्री कॉम्बोची किंमत ३,१९,००० रूपये आहे, जे स्मार्ट ऑटोमेशनसह ऑल-इन-वन वॉशिंग व ड्राइंग सोयीसुविधा देते. बीस्पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनरची किंमत ३६,००० रूपयांपासून सुरू होते, तर बीस्पोक एआय डबल डोअर रेफ्रिजरेटर ४४,००० रूपये किमतीपासून उपलब्ध आहे. स्मार्ट लॉण्ड्री सोल्यूशन्सचा शोध घेत असलेल्यांसाठी बीस्पोक एआय टॉप लोड वॉशरची किंमत ८ किग्रॅ मॉडेलकरिता २४,५०० रूपयांपासून सुरू होते. एआय होम डिस्प्ले एकीकृत असलेला बीस्पोक एआय फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर जुलैपासून उपलब्ध असेल.