Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio युजर्स वेळीच व्हा सावध! स्मार्टफोनवर हा मेसेज आला तर लगेच करा Delete, नाहीतर पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही

Jio Alert : रिलायन्स जियोने ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कंपनीने सांगितले की जियोच्या नावाने काही बनावटी कॉल्स आणि मेसेज पाठवले जात आहेत, ज्यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 27, 2025 | 02:33 PM
Jio युजर्स वेळीच व्हा सावध! स्मार्टफोनवर हा मेसेज आला तर लगेच करा Delete, नाहीतर पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही

Jio युजर्स वेळीच व्हा सावध! स्मार्टफोनवर हा मेसेज आला तर लगेच करा Delete, नाहीतर पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • जिओच्या नावाने ग्राहकांना पाठवले जात आहेत फेक कॉल्स आणि मेसेज
  • कंपनीने ग्राहकांना दिला सतर्कतेचा इशारा
  • फसवणुकीपासून ग्राहकांना सुरक्षित करण्यासाठी जिओने शेअर केले महत्त्वाचे अलर्ट्स
रिलायन्स जिओने आपल्या लाखो ग्राहकांना एक महत्त्वाचा मेसेज पाठवून सावध केलं आहे. कंपनीने स्पष्टपणे सांगितलं आहे की, काही फ्रॉडर्स कंपनीच्या नावाने बनावटी कॉल्स आणि मेसेज पाठवत आहेत. जियोने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहकांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे ते अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकतात.

बनावटी कॉल्स आणि मेसेजपासून कसे वाचावे?

जिओने आपल्या सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कंपनीने सांगितले की, फसवणूक करणारे लोक ग्राहकांना जिओच्या नावाने कॉल किंवा मेसेज पाठवून, त्यांना काही अज्ञात लिंक किंवा थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याची सूचना करतात. जर तुम्हाला असे काही मेसेज किंवा कॉल्स येत असतील, तर तुम्हाला त्यावर त्वरित कारवाई करावी लागेल.

जिओने दिलेले महत्त्वाचे अलर्ट्स

OnePlus चा 9000mAH बॅटरी असणारा क्लासी 5G फोन, स्नॅपड्रॅगन 8 सिरीज चिपसेटसह ग्राहकांना करतोय आकर्षित

थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करणे टाळा

जिओने स्पष्टपणे सांगितले आहे की, कंपनी आपल्या ग्राहकांना कधीही थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करण्यास सांगत नाही. जर तुम्हाला असा कोणताही संदेश आला, ज्यात तुम्हाला अनोळखी ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जात असेल, तर तो मेसेज त्वरित डिलीट करा. जिओचे सर्व काम फक्त MyJio ॲप किंवा जियोच्या अधिकृत वेबसाइटवरूनच होते.

अज्ञात लिंकवर क्लिक करू नका

कंपनीने सांगितले की, फ्रॉड मेसेजेसमध्ये बहुतेक वेळा एक लिंक दिली जात असते, जी जिओच्या वेबसाइट किंवा MyJio ॲपच्या बाहेर उघडते. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळा, कारण असे केल्याने तुमचा फोन हॅक होऊ शकतो किंवा तुमचे बँक अकाउंट रिकामे होऊ शकते.

MyJio ॲपवरून माहिती चेक करा

जर तुम्हाला काही संशयास्पद मेसेज किंवा कॉल येत असतील आणि तुम्हाला ते खरे आहेत की फसवणूक आहे हे समजत नसेल, तर तुम्ही MyJio ॲपवर लॉगिन करून तुमची सर्व माहिती तपासू शकता. जिओने सांगितले आहे की, खरी आणि अचूक माहिती फक्त MyJio ॲप किंवा जियोच्या अधिकृत वेबसाइटवरच मिळेल.

खासगी माहिती कधीही शेअर करू नका

कंपनीने सर्व ग्राहकांना सांगितले आहे की, कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या कॉलवर तुम्हाला तुमची खाजगी माहिती विचारली जात नाही. त्यामुळे तुम्ही कधीही तुमचा OTP, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर, डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, कार्डवरील CVV कोड, कार्डची एक्सपायरी डेट, बँक ATMs PIN, इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा MyJio ॲपचा पासवर्ड किंवा लॉगिन OTP इत्यादी माहिती शेअर करू नका.

Hanuman Chalisa ने रचला इतिहास! YouTube वर 5 अब्ज व्ह्यू पार करणारा पहिला भारतीय व्हिडिओ

फसवणूक रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलणे महत्त्वाचे

जिओने या सर्व बाबींवर लक्ष ठेवून ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे, जियोने आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे की, जर त्यांना फसवणूक झाल्यास, ते त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवू शकतात आणि जियो कस्टमर केअरला देखील माहिती देऊ शकतात. हे सर्व नियम आणि अलर्ट्स जियो ग्राहकांना फसवणुकीपासून रोखण्यासाठी मदत करतील. त्यामुळे जियो ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून, आपली माहिती सुरक्षित ठेवली पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे.

Web Title: Jio fake message alert company warned customers to immediately delete fake link or messsages tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • jio
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Hanuman Chalisa ने रचला इतिहास! YouTube वर 5 अब्ज व्ह्यू पार करणारा पहिला भारतीय व्हिडिओ
1

Hanuman Chalisa ने रचला इतिहास! YouTube वर 5 अब्ज व्ह्यू पार करणारा पहिला भारतीय व्हिडिओ

OnePlus चा 9000mAH बॅटरी असणारा क्लासी 5G फोन, स्नॅपड्रॅगन 8 सिरीज चिपसेटसह ग्राहकांना करतोय आकर्षित
2

OnePlus चा 9000mAH बॅटरी असणारा क्लासी 5G फोन, स्नॅपड्रॅगन 8 सिरीज चिपसेटसह ग्राहकांना करतोय आकर्षित

थांबा! WhatsApp वापरताना तुम्ही ‘या’ ४ गोष्टी करत आहात का? ‘आजच’ बंद होऊ शकते तुमचे अकाउंट
3

थांबा! WhatsApp वापरताना तुम्ही ‘या’ ४ गोष्टी करत आहात का? ‘आजच’ बंद होऊ शकते तुमचे अकाउंट

Black Friday Sale: iPhone 16 मिळणार कमालीचा स्वस्त, 40,000 रूपयांपेक्षाही कमी भावात, ग्राहकांची चंगळ
4

Black Friday Sale: iPhone 16 मिळणार कमालीचा स्वस्त, 40,000 रूपयांपेक्षाही कमी भावात, ग्राहकांची चंगळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.