जिओच्या धडाकेबाज ऑफर्स (फोटो सौजन्य - iStock)
Reliance Jio ने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. आता वापरकर्त्यांना जिओच्या काही निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनदेखील मिळत आहे.
यासह, वापरकर्त्यांना वेगळे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन घेण्याची आवश्यकता नाही आणि ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यांचे आवडते शो आणि चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील. तसंच जिओचे दोन प्लान असून त्यामध्ये कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत, ते आपण जाणून घेऊया. या दोन्ही प्लॅनमध्ये मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल, त्यानुसार आपण दोन्ही प्लॅन बघूया.
₹1,299 चा जिओ प्लॅन
₹1,799 चा जिओ प्लॅन
रिचार्ज कसे करावे?
वापरकर्ते MyJio App, जिओची अधिकृत वेबसाइट किंवा कोणत्याही लोकप्रिय पेमेंट App (जसे की PayTM, PhonePe, Google Pay) वरून हे प्लॅन रिचार्ज करू शकतात. रिचार्ज केल्यानंतर, वापरकर्ते त्यांचे नेटफ्लिक्स खाते लिंक करू शकतात किंवा नवीन खाते तयार करू शकतात आणि लगेच स्ट्रीमिंग सुरू करू शकतात.
डील खास का आहे?
बाजारात नेटफ्लिक्सच्या बेसिक प्लॅनची किंमत दरमहा ₹१४९ पासून सुरू होते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ₹१,२९९ किंवा ₹१,७९९ चा जिओ प्लॅन निवडला तर तुम्हाला एकाच रिचार्जमध्ये कॉलिंग, इंटरनेट, एसएमएस, जिओ सेवा आणि नेटफ्लिक्सची सुविधा मिळते. ही ऑफर विशेषतः मनोरंजन आणि डेटा दोन्हीची आवड असलेल्या वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे.
१७२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक फायदेदेखील उपलब्ध
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. यामध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग तसेच दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातात. तसेच, या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, झी५, एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम आणि Jio Hotstar सुपरचे मोफत सबस्क्रिप्शनदेखील मिळते. इतकेच नाही तर वापरकर्त्यांना पॅक अंतर्गत अमर्यादित 5G डेटा देखील मिळतो. त्यात स्पॅम फायटिंग नेटवर्क आणि मोफत हेलोट्यून सुविधा देखील दिली जाते. या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे.