Jio घेऊन आलाय अनोखा फॅमिली प्लॅन, एकत्र चालणार 4 SIM; अनलिमिटेड कॉलिंग आणि 75GB डेटासह मिळणार बरेच फायदे
Jio सध्या त्यांच्या युजर्ससाठी एकापेक्षा एक भन्नाट ऑफर्स सादर करत आहे. कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही युजर्ससाठी आकर्षक आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस, इंटरनेट डेटासोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन देखील ऑफर केले जात आहे. आता देखील कंपनीने एक नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. खरं तर हा रिचार्ज प्लॅन त्यांच्या इतर रिचार्ज प्लॅनपेक्षा थोडा वेगळा आहे.
जिओने त्यांच्या युजर्ससाठी नुकताच एक आकर्षक आणि धमाकेदार फॅमिली प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकाच रिचार्जवर एकत्र चार सिम वापरता येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनची किंमत प्रति महिना 500 रुपयांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेला हा प्लॅन अशा लोकांसाठी एक उत्तम ऑप्शन ठरणार आहे, ज्यांना रिचार्ज प्लॅनवर हाय स्पीड डेटासोबतच प्रीमियम सब्सक्रिप्शनचा देखील फायदा पाहिजे आहे. जिओने लाँच केलेल्या या फॅमिली रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी या फॅमिली प्लॅनमध्ये 75GB हाय-स्पीड डेटा ऑफर करत आहे. हा इंटरनेट डेटा संपल्यानंतर युजर्सना 10 रुपये प्रति GB चार्ज द्यावा लागणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 SMS ची सुविधा देखील ऑफर केली जात आहे. एवढंच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्स त्यांचे 3 फॅमिली सिम जोडू शकणार आहेत. त्यामुळे एकाच रिचार्ज प्लॅनमध्ये 4 सिम वापरले जाऊ शकतात. प्रत्येक जास्तीच्या सिमवर ग्राहकांना 5GB एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. तथापि, फॅमिली सिम जोडल्यास प्रति सिम 150 रुपये/महिना शुल्क आकारले जाईल.
जिओच्या या जबरदस्त फॅमिली प्लॅनमध्ये युजर्सना डेटा आणि कॉलिंग सुविधेसोबतच अनेक प्रीमियम सब्सक्रिप्शनचे फायदे देखील दिले जाणार आहेत. या प्लॅनमध्ये 3 महिन्यांचे JioHotstar: मोबाइल/टीवी सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये ऑफर केलं जात आहे. यासोबतच प्लॅनमध्ये JioSaavn Pro चे 1 महीन्याचे फ्री सब्सक्रिप्शन, JioAICloud चे 50GB फ्री स्टोरेज, Netmeds चे 6 महीन्याची Netmeds First मेम्बरशिप, Zomato Gold चे 3 महीन्याचे फ्री सब्सक्रिप्शन आणि EaseMyTrip देशांतर्गत उड्डाणांवर 2220 रुपयांपर्यंत आणि हॉटेल्सवर 15% पर्यंत सूट देते.
याशिवाय, Reliance Digital वर 399 रुपयांचे डिस्काऊंट, Ajio वर 200 रुपयांचे डिस्काऊंट आणि JioHome चे 2 महीन्याचे फ्री ट्रायल देखील ऑफर केलं जाणार आहे. जर तुम्ही Jio चे 5G एलिजिबल यूजर असाल तर तुम्हाला या रिचार्ज प्लॅनसोबत अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे.