गेमर्सची मजाच मजा! Jio ने लाँच केले नवीन प्रीपेड गेमिंग प्लॅन्स, किंमत केवळ 48 रुपयांपासून सुरु
Reliance Jio भारतात त्यांच्या प्रीपेड सब्सक्राइबर्ससाठी नवीन गेमिंग-सेंट्रिक रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. हे प्लॅन्स विशेषत: गेमर्ससाठी लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने लाँच केलेले अनेक प्लॅन्स अॅड-ऑन आहेत. म्हणजेच यामध्ये व्हॉईस कॉल आणि SMS बेनिफिट्सची सुविधा देण्यात आली नाही. या प्लॅन्सचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे अॅक्टिव बेस सब्सक्रिप्शन प्लॅन असणं गरजेचं आहे. टेलीकॉम ऑपरेटर ग्राहकांना JioGames Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे, जे JioGames अॅप, वेब ब्राउजर आणि JioFiber सेट-टॉप बॉक्सवर हाय-क्वालिटी गेमिंग टाइटल्सला स्ट्रीम करण्याची सुविधा देते.
Cyber Attack नक्की असतो तरी काय? कसा केला जातो आणि किती होतं नुकसान? जाणून घ्या सविस्तर
जिओने लाँच केलेल्या या गेमिंग प्लॅनची सुरुवातीची किंमत 48 रुपये आहे. 48 रुपयांचा हा गेमिंग अॅड-ऑन प्रीपेड रिचार्ज प्लॅन 10MB हाय-स्पीड इंटरनेट डेटा आणि 3 दिवसांच्या व्हॅलिडीटसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये पॅकच्या व्हॅलिडीटी कालावधीसाठी JioGames Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे. तर 98 रुपयांच्या गेमिंग अॅड-ऑन पॅकमध्ये 48 रुपयांप्रमाणेच फायदे दिले जात आहे. मात्र या प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांची आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेलीकॉम ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना दिर्घ कालावधीसाठी JioGames Cloud चा फ्री अॅक्सेस पाहिजे, ते 298 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज अॅड-ऑन पॅकची निवड करू शकता. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या संपूर्ण कालावधीसाठी ग्राहकांना JioGames Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. हा रिचार्ज अॅड-ऑन 3GB हाय-स्पीड इंटरनेट डेटा ऑफर करतो. अॅड-ऑन डेटा पॅक्स केवळ डेटा बंडल ऑफर करतात. यामध्ये व्हॉईस कॉलिंग किंवा SMS बेनिफिट्स ऑफर केले जात नाहीत.
याशिवाय कंपनीने JioGames Cloud सब्सक्रिप्शनसह दोन स्टँडअलोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स देखील लाँच केले आहेत. कंपनीच्या 495 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. यामध्ये 1.5GB डेली हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉल आणि रोज 100 SMS ऑफर केले जातात. यामध्ये JioGames Cloud आणि FanCode चे 28 दिवसांचे सब्सक्रिप्शन, JioHotstar चा तीन महीने फ्री अॅक्सेस, JioTV आणि 50GB Jio AICloud स्टोरेज देखील समाविष्ट आहे. कंपनीने 544 रुपयांचा प्लॅन देखील लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये 495 रुपयांप्रमाणे फायदे दिले जात आहेत. मात्र डेली डेटा अलाउंस 2GB पर डे आहे.
JioGames Cloud एक क्लाउड-बेस्ड गेम-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. हा कोणत्याही महागड्या हार्डवेयर किंवा फिजिकल मीडियाच्या हाय-क्वालिटी, कंसोल-लेवल गेमिंग ऑफर करतो. जिओच्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे समर्थित, हे वापरकर्त्यांना स्मार्टफोन, पीसी आणि जिओ सेट-टॉप बॉक्सवर गेम स्ट्रीम करण्याची आणि खेळण्याची परवानगी देते. भारतात जिओगेम्स क्लाउड सबस्क्रिप्शन 398 रुपयांना उपलब्ध आहे आणि त्याची वैधता 28 दिवसांची आहे. तथापि, कंपनी म्हणते की ही सुरुवातीची किंमत आहे, त्यानंतर किंमत 499 रुपये असेल.