Cyber Attack नक्की असतो तरी काय? कसा केला जातो आणि किती होतं नुकसान? जाणून घ्या सविस्तर
सध्याच्या डिजीटल आणि इंटरनेटच्या जगात लोकांचं आयुष्य पूर्णपणे मोबाईलवर अवलंबून आहे. इंटरनेट आणि मोबाईलशिवाय तर आपल्या जीवनाची कल्पना करणं देखील अशक्य आहे. इंटरनेट आणि मोबाईलमुळे आपलं जीवन जरी सोपं झालं असलं तरी देखील यामध्ये अनेक मोठी संकट आपल्यासमोर असतात. यातीलच एक संकट म्हणजेच सायबर अटॅक. तुम्ही अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील की एखाद्या कंपनी किंवा देशावर सायबर अटॅक झाला आहे, पण हा सायबर अटॅक नक्की होतो कसा हे तुम्हाला माहिती आहे का?
साइबर अटॅक कोणत्याही कंप्यूटर सिस्टम, नेटवर्क किंवा डिजिटल डिव्हाइसवर केला जाऊ शकतो. या डिव्हासेसवर जेव्हा अनधिकृतपणे डेटा चोरण्यासाठी किंवा बदलण्यासाठी किंवा डिसेबल करण्यासाठी जाणूनबाजून डिजीटल पद्धतीने जो हल्ला केला जातो, त्याला सायबर अटॅक असं म्हणतात. हा स्कॅमर्सद्वारे व्यक्तिगत, आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी केला जातो. (फोटो सौजन्य – Pinterest)
सायबर अटॅक वेगवेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. यामध्ये मालवेयरचा वापर करणं ही सर्वात सामान्य गोष्ट आहे. मालवेयर एक असा सॉफ्टवेयर आहे, ज्यामध्ये वायरस, वर्म, ट्रोजन आणि रँसमवेयर यांचा समावेश असतो. हे सॉफ्टवेयर तुमच्या सिस्टममध्ये घुसून डेटाला नुकसान पोहोचवू शकतो आणि तुमचा डेटा लिक करू शकतो किंवा चोरू शकतो. सहसा हा मालवेअर ईमेल अटॅचमेंट किंवा चुकीच्या वेबसाइट्सद्वारे परसतो.
सायबर अटॅकमध्ये स्कॅमर्सचा फार मोठा रोल असतो. स्कॅमर्स त्यांच्या गोड बोलण्याने सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याकडून सर्व डेटा काढून घेतात, ज्यामध्ये पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर इत्यादींचा समावेश असतो. एकदा का ही संवेदनशील माहिती स्कॅमर्सच्या हाती पडली की तुमचा सर्व डेटा आणि अॅक्सेस स्कॅमर्सकडे जातो. स्कॅमर्स लोकांना फोन आणि मॅसेज करून ते विश्वसनीय संस्था, बँक किंवा पोलीस अधिकारी बोलत असल्याच दावा करतात.
एवढंच नाही तर स्कॅमर्स लोकांच्या फोनवर एक खोटा मॅसेज देखील पाठवतात. ज्यामुळे लोकांचा त्यांच्या विश्वास बसतो. यामध्ये स्कॅमर्स एखादी खोटी वेबसाईट किंवा खोटी लिंक पाठवतात, ज्यावर क्लिक करताच लोकांचं नुकसान होतं. स्कॅमर वेबसाइट किंवा सर्व्हरवर इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाठवतात की ते ओव्हरलोड होते आणि वॅलिड यूजर्ससाठी अनुपलब्ध होते. याचा अर्थ सिस्टम किंवा नेटवर्कमध्ये प्रवेश रोखण्यासाठी ओव्हरलोड करणे.
साइबर हल्ल्यासारख्या घटनांमध्ये नुकसान व्यक्तिगत आणि संघटनात्मक दोन्ही स्तरांवर होते. सायबर हल्ल्यांमध्ये वित्तीय नुकसान अधिक होतं. बँक अकाउंटमधून पैशांची चोरी, क्रेडिट कार्ड फसवणूक आणि सिस्टम डाउन झाल्यामुळे व्यावसायिक नुकसान देखील होतं. व्यक्तिगत माहितीसाठी, कॉन्फिडेंशियल बिजनेस डेटा आणि ग्राहक डेटाची चोरी होऊ शकते. ज्याचा वापर खोटी ओळख तयार करण्यासाठी केला जातो.