Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत
टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या प्रत्येक युजरसाठी विविध आणि नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येकाच्या आवडीचे रिचार्ज प्लॅन आहेत. त्यामुळे अगदी स्वस्त रिचार्जपासून महागड्या रिचार्जपर्यंत यूजर्स सर्वांचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला फक्त डेटा प्लॅन पाहिजे असेल किंवा अनलिमिटेड कॉलिंगवाला प्लॅन जिओच्या पोर्टफोलिओमध्ये सर्व रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. या पोर्टफोलिओमध्ये असे देखील काही प्लॅन आहेत, ज्यामध्ये फ्री डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह इतर बेनिफिट्स देखील ऑफर केले जातात.
आता आम्ही तुम्हाला अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये कंपनी दररोज 3GB डेटासह व्हॅलिडीटी आणि नेटलिक्स सबस्क्रीप्शन देखील ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे आणि त्यामध्ये किती दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते याबद्दल जाणून घेऊया. जिओ त्यांच्या युजरसाठी ऑफर करत असलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1799 रुपये आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तीन महिने चिंता करण्याची गरज नाही. एवढच नाही तर या रिचार्ज प्लॅनमधे इतर अनेक फायदे देखील ऑफर केले जातात. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जियो हॉटस्टारचे फ्री मोबाइल सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे जर तुम्ही अशा क्षेत्रात राहत असाल जिथे 5G नेटवर्क उपलब्ध आहे, तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकणार आहेत. कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा ऑफर करत आहे. म्हणजेच युजर्सना दिवसभर भरपूर डेटा मिळणार आहे.
याशिवाय कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकणार आहात. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. इतर फायद्यांमध्ये मोफत बेसिक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहेत.
जर तुम्ही थोड्या कमी पैशांत 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर 1199 रुपयांवाला प्लॅन देखील बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये देखील कंपनी 1799 रुपयांवाल्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे फायदे ऑफर करतात. मात्र या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन ऑफर केलं जात नाही. या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टारचे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5जी अॅक्सेस देखील आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.