WhatsApp Update: Spam ला लागणार ब्रेक! मेसेजिंग प्लॅटफॉर्म लागू करणार मंथली मेसेज लिमिट, असे असतील नियम
व्हाट्सअॅप त्यांच्या युजरसाठी नेहमीच नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. हे फीचर्स आणि अपडेट्स सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी जारी केले जातात. आता पुन्हा एकदा व्हाट्सअपने त्यांच्या युजरसाठी पुन्हा एक नवीन फिचर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या फीचरमध्ये नको असलेले मेसेज थांबवण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. सध्या कंपनी एका नवीन फीचरची टेस्टिंग करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे नवीन फीचर युजर्स आणि व्यवसायात पाठवलेल्या मेसेजची लिमिट ठरवणार आहे. हे असे मेसेज असणार आहेत जे कॉन्टॅक्टमध्ये अॅड आहेत आणि युजर्सना या मेसेजचे उत्तर देखील द्यायचे नाही.
जारी करण्यात येणाऱ्या नव्या फीचर्सचा उद्देश यूजर्सना एक व्यवस्थित इनबॉक्स ऑफर करणे असा आहे. सर्वात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये व्हाट्सअॅप एका साधारण चॅट ॲपमधून एका मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये डेव्हलप झाला आहे. त्यामध्ये कम्युनिटी बिजनेस अकाउंट आणि कस्टमर सर्विस चॅनल यांचा समावेश आहे. वाढीसह व्हाट्सअपवर नको असलेले मेसेज आणि प्रमोशन मेसेजची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अनेक युजर्सना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. समस्या लक्षात घेऊन आता व्हाट्सअॅपने एक नवीन फिचर जारी करण्याचा विचार करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या अहवालानुसार, व्हाट्सअॅप आता अशा लोकांची मंथली मेसेज लिमिट ठरवणार आहे जे युजर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आणि जे सतत मेसेज करत असतात. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला मेसेज केला ज्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुम्ही अॅड नाही तर अशा व्यक्तीसाठी तुमची मेसेज लिमिट ठरवली जाणार आहे.
उदारणार्थ, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तीन मेसेज पाठवले आणि त्या व्यक्तीने त्या मेसेजची उत्तर दिले नाही तर त्या महिन्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मेसेजचा वापर तुम्ही केला आहे. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला त्यानंतर त्या महिन्यात मेसेज करू शकत नाही. पण जर समोरच्या व्यक्तीने तुमच्या मेसेजचे उत्तर दिले तर ही समस्या उद्भवणार नाही. सध्या कंपनीने नवीन फीचरबाबत जास्त माहिती दिलेली नाही. कंपनीने सांगितलं आहे की, कंपनी सध्या वेगवेगळ्या लिमिटबाबत चाचणी करत आहे. या मेसेजच्या मंथली लिमिटपर्यंत पोहोचल्यानंतर युजर्सना एक नोटिफेकेशन पाठवलं जाणार आहे. एकदा ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचले की, त्यांना नवीन संपर्कांना संदेश पाठवण्यापासून तात्पुरते ब्लॉक केले जाऊ शकते.
व्हाट्सअॅपने सांगितलं आहे की, सामान्यतः मित्र आणि कुटुंबाशी चॅट करणाऱ्या नियमित यूजर्सवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. हे नवीन वैशिष्ट्य स्पॅम कमी करण्यासाठी WhatsApp च्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे, विशेषतः भारतात, जिथे या प्लॅटफॉर्मचे 50 करोडहून अधिक यूजर्स आहेत.
गेल्यावर्षी व्हाट्सअॅपने अनेक अँटी-स्पॅम टूल सादर केले होतं. ज्यामध्ये मार्केटिंग मेसेजवर प्रतिबंध, व्यावसायिक चॅटसाठी सदस्यता समाप्त करण्यासाठी ऑप्शन आणि ब्रॉडकास्टिंग मेसेजवर सिमा असणार आहेत. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या व्यवसायांना आता मोठ्या प्रमाणात संदेश पाठवण्याऐवजी खरे संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.