
Samsung Galaxy A07 5G: बजेट सेगमेंट पुन्हा हादरलं! 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह होणार नव्या स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स
कंपनीने अद्याप त्यांच्या लेटेस्ट Galaxy A07 5G स्मार्टफोन स्मार्टफोनच्या किंमतीची घोषणा केली नाही. मात्र अशी आशा आहे की, येणाऱ्या दिवसांत कंपनी स्मार्टफोन विक्रीची तारीख आणि किंमत जाहीर करू शकते. हा फोन सध्या फिलीपींसमध्ये लाँच करण्यात आला आहे. तिथे हा स्मार्टफोन ब्लॅक आणि लाइव वायलेट अशा दोन रंगात उपलब्ध आहे. फिलीपींसमध्येया डिव्हाईसच्या 4GB रॅम+ 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत PHP 8,290 म्हणजेच सुमारे 13 हजार रुपये आहे. भारतात हा स्मार्टफोन 11 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X)
Galaxy A07 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. म्हणजेच बजेट सेगमेंटमध्ये हा स्मार्टफोन स्मूद स्क्रॉलिंग एक्सपीरियंस ऑफर करतो. हाय रिफ्रेश रेटसह सॅमसंगच्या या डिव्हाईसची टॉप ब्राइटनेस 800 निट्सपर्यंत आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये रेनफोर्स टेंपर्ड ग्लास दिला आहे.
Galaxy A07 5G स्मार्टफोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. प्रायमरी लेंससह सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, कॅमेरा सेटअप डेली फोटोग्राफीसाठी बेस्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
सॅमसंगच्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Galaxy A07 5G मध्ये 5जी इनेबल प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगच्या One UI वर आधारित आहे. या फोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी फीचर्स जसे सिस्टम वाइड सिक्योरिटी कंट्रोल आणि अॅप मॅनेजमेंट टूल्स दिले आहेत. कनेक्टिविटी ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 5G सपोर्ट, डुअल सिम फंशनॅलिटी आणि स्टँडर्ड वायरलेस फीचर दिला आहे.
Galaxy A07 5G स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. कंपनी म्हणते की त्यांनी मागील पिढीच्या तुलनेत 20 टक्के मोठी बॅटरी दिली आहे. याव्यतिरिक्त, हा सॅमसंग फोन 25W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो.
Ans: Samsung स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टवॉच, इअरबड्स आदी प्रॉडक्ट्स बनवते.
Ans: सॅमसंग स्मार्ट टीव्ही टिझेन ओएसवर चालतो.
Ans: Samsung ची भारतात मोठी सर्व्हिस नेटवर्क आहे आणि ग्राहक सेवा चांगली मानली जाते.