
Jio vs Airtel vs Vi: 1.5GB डेली डेटासह येणारा सर्वात स्वस्त प्लॅन कोणत्या कंपनीचा? जाणून घ्या सविस्तर
OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक
जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये यूजर्सना 1.5GB डेली डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबतच कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि रोज 100 एसएमएस देखील ऑफर केले जातात. डेली डेटा लिमिट संपल्यानतर प्लॅनमध्ये डेटाची स्पीड कमी होऊन 64 Kbps होते. याशिवाय या प्लॅनममध्ये जिओटीव्ही आणि जिओएआयक्लाउड अॅप्सचा अॅक्सेस देखील दिला जातो. कंपनीकडे एक 239 रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये यूजर्सना 22 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. (फोटो सौजन्य – Pinterest)
एयरटेल त्यांच्या यूजर्सना 299 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन ऑफर करतो, ज्यामध्ये डेली 1GB डेटा दिला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. 1.5GB डेली डेटा प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत 349 रुपये आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी दिले जाते. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स, रोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड 5G देखील ऑफर केला जातो. याशिवाय कंपनीच्या या प्लॅनमध्ये सोनीलिव्ह सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले सबस्क्रिप्शन अंतर्गत 20 ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस देखील दिला जातो. यामध्ये फ्री कॉलर ट्यून देखील दिली जाते.
Vi देखील त्यांच्या यूजर्सना एयरटेलप्रमाणे 299 रुपयांचा एक प्लॅन ऑफर करते, ज्याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1GB डेली ऑफर केला जातो. तर 1.5GB डेली डेटा वाल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत एयरटेलप्रमाणेच 349 रुपये आहे. यामध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबतच कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स, रोज 100 एसएमएस, रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा आणि डेटा रोलओवर ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये देखील डेली डेटा मर्यादा स्पीड 64Kbps आहे. याव्यतिरिक्त, अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे.