
LG ची कमाल! AI DD 2.0 तंत्रज्ञानाची नवी वॉशिंग मशीन रेंज लाँच, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत
LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडने त्यांच्या नवीन अत्याधुनिक वॉशिंग मशीन सिरीजची घोषणा केली आहे. या सिरीजमध्ये प्रीमियम डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन सिरीजमध्ये वॉशर ड्रायर, फ्रंट लोड वॉशिंग मशीन्सपासून ते टॉप लोड वॉशिंग मशीन्सपर्यंतचे 10 मॉडेलचा समावेश आहे. कंपनीने दावा केला आहे की, या सिरीजमधील वॉशिंग मशीन कंपड्यांची उत्तम काळजी घेऊ शकतात. यामध्ये इंटेलिजेंट पद्धतीने कपडे धुतले जातात आणि सुधारित सोयीसाठी प्रगत AI चा त्यामध्ये समावेश केला आहे. भारतातील कुटूंबान रोजच्या जीवनात मशीनचा वापर व्हावा आणि कपडे धुणे अधिक सोपे व्हावे, याच उद्देशाने नवीन सिरीज लाँच करण्यात आली आहे.
Free Fire Max: डेली स्पेशल सेक्शन म्हणजे नेमकं काय? प्लेयर्सना असे मिळतात जबरदस्त फायदे
AI डिटेक्शन, वॉशिंग परफेक्शन, या टॅगलाईनसह कंपनीने नवीन सिरीजची घोषणा केली आहे. या नवीन सिरीजमध्ये कंपनीने प्रगत AIDD 2.0 तंत्रज्ञान कसे फॅब्रिक प्रकार आणि गरजा अचूकपणे ओळखणं आणि कमीत कमी प्रयत्नात उत्कृष्ट वॉशिंग करणं ज्यामुळे ग्राहकांना सुविधा मिळते, या गोष्टीवर भर दिला आहे.
LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमीटेडचे विक्री व विपणन अधिकारी सह-प्रमुख संजय चिटकारा म्हणाले, “LG मध्ये, आम्ही स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे आमच्या ग्राहकांचे दैनंदिन काम सोपे करून त्यांचे जीवन आरामदायी बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. नवीन AIDD 2.0 वॉशिंग मशीन ही त्या वचनबद्धतेची साक्षीदार आहे. स्मार्ट तंत्रज्ञान, शक्तिशाली कामगिरी आणि विचारपूर्वक तयार केलेले डिझाइन यांसह, ही श्रेणी सुविधा, काळजी आणि ऊर्जा कार्यक्षमता देण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही सीरिज कपडे धुण्याचा अनुभव पुर्वीपेक्षा चांगला करेल आणि ग्राहकांचा दैनंदिन गरजांसाठीचा पसंतीचा पर्याय ठरेल.”
फ्रंट लोड वॉशिंग मशीनचा लूक अतिशय आधुनिक आहे. ही मशीन उत्तम पद्धतीने कपडे धुते, विशेष स्वच्छता आणि ऊर्जा कार्यक्षमता सुद्धा देते. AI DD 2.0 तंत्रज्ञानाद्वारे आधारित असलेली ही मशीन फॅब्रिकचे वजन, प्रकार आणि मातीचा स्तर ओळखते आणि त्यानुसार कपड्यांना योग्य संरक्षण देते आणि कपड्यांची काळजी घेण्यासाठी ऑटोमॅटिक वॉश सायकल निवडते. स्टीम+ तंत्रज्ञानामुळे कपड्यांवरील सुरकुत्या कमी होतात आणि अॅलर्जन नष्ट होतात. यामुळे कपडे ताजे, स्वच्छ आणि मुलायम राहतात. TurboWash®️ 360° या फिचरमध्ये मल्टी-डायरेक्शनल वॉटर जेट्स असतात, त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड न करता फक्त 39 मिनिटांत कपडे पूर्णपणे स्वच्छ होतात. eZDispense™️ जवळजवळ 30 वॉशसाठी अखंड ऑटो-डोजिंग देते, ज्यामुळे सहज सुविधा मिळते.
LG ThinQ™️ स्मार्ट कनेक्टिव्हिटीसह, यूजर मशीनला रिमोटने नियंत्रित करू शकतात आणि तिची देखरेख करू शकतात, ज्यामुळे दैनंदिन कपडे धुण्याच्या कामात मदत होते. AIDD 2.0 सिरीजमध्ये नाजूक कापड आणि संवेदनशील त्वचेसाठी डिझाइन केलेले ऍलर्जी केअर आणि बेबी स्टीम केअरसारखे विचारपूर्वक तयार केलेले कार्यक्रम देखील समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, मायक्रो प्लास्टिक केअर सायकल सूक्ष्म प्लास्टिक बाहेर पडण्याचे प्रमाण 60% पर्यंत कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे LG चे शाश्वतता आणि समुद्राचे संरक्षण यावर लक्ष केंद्रित होते. अत्यावश्यक गोष्टींवर भर देणाऱ्या डिझाइनसह फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या नवीन श्रेणीमध्ये डिजिटल डायल LCD आहे, ज्यामुळे एक सुंदर आधुनिक स्पर्श जोडला जातो आणि दैनंदिन वापरासाठी अधिक सहज, हवे तसे नियंत्रण मिळते. क्रोम फिनिशसह फ्लॅट टेम्पर्ड ग्लास डोअर असलेली श्रेणी प्रीमियम रंगांमध्ये आहे ज्यामुळे ती आधुनिक घरांमध्ये स्टायलिश दिसते. ऊर्जा आणि पाण्याच्या कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेले, नवीन मॉडेल्स एकाच अत्याधुनिक पॅकेजमध्ये कार्यक्षमता, काळजी आणि सुंदरता या तिन्ही गोष्टी एकत्र येतात.
वॉशर ड्रायर मॉडेल्सची ही नवीन श्रेणी मोठ्या क्षमतेमध्ये प्रस्तुत करण्यात आली आहे, ज्यामध्ये 20/10 किलो आणि 15/8 किलो यांचा समावेश आहे. जी खास करून एकाच मशीनमध्ये कपडे धुणे आणि वाळवणे दोन्ही शोधणाऱ्या घरांसाठी डिझाइन केलेली आहे. हे मॉडेल्स उच्च-कार्यक्षमतेचे वॉश सायकल देतात ज्यामध्ये कपडे आदर्श पद्धतीने वाळवले जातात. पावसाळ्यात, उंच इमारतींमध्ये किंवा कपडे वाळवण्यासाठी मर्यादित जागा असलेल्या घरांसाठी हे अगदी योग्य आहे. प्रगत तंत्रज्ञानासह, हे मॉडेल जलद, सोयीस्कर आणि संपूर्ण कपडे धुण्याची काळजी घेणारे, एकाच मशीनमध्ये ऑल-इन-वन वॉश-ड्राय सुविधा देतात.
ही मशीन शक्तिशाली कार्यक्षमता आणि इंटिलिजंट पद्धतीने कपड्याची काळजी घेणे या दोन्हींचे एकत्रीकरण देऊन उच्च दर्जाचा वॉशिंग अनुभव देते. प्रगत AI DD तंत्रज्ञान इंटिलिजंट पद्धतीने कपड्याचे वजन आणि प्रकार ओळखते आणि 20,000 संभाव्य संयोजनांमधून ऑटोमॅटिक पद्धतीने योग्य तो वॉश पॅटर्न निवडते, ज्यामुळे सौम्य पद्धतीने काळजी घेऊन सुद्धा प्रभावी स्वच्छता निश्चितच मिळते. TurboWash®️ फिचरमुळे केवळ 29 मिनिटांत पूर्ण दिलेला कपड्यांचा भार धुण्यास मशीन सक्षम होते, ज्यामुळे व्यस्त कुटुंबांसाठी वेग आणि कार्यक्षमता दोन्ही देते. स्वच्छतेची खात्री होण्यासाठी, यामध्ये इन-बिल्ट हीटरसह स्टीम 99.9% पर्यंत ऍलर्जन काढून टाकते, आरोग्याबाबत जागरूक कुटुंबांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित कपडे धुण्यास मदत करते.
त्याच्या सुविधांमध्ये भर घालत, LG ThinQ™️ वाय-फाय कनेक्टिव्हिटी वापरकर्त्यांना स्मार्टफोनद्वारे संपूर्ण नियंत्रण देऊन मशीनपासून दूर राहून सुद्धा वॉश सायकल चालवण्याची, देखरेख करण्याची आणि त्याचे शेड्यूल करण्याची सुविधा देते. या मशीनमध्ये टिकाऊपणासाठी वॉटर रेझिस्टंट IPX4-रेटेड कंट्रोल पॅनल आणि मागील पॅनलवर प्रीमियम जॉग डायल डिझाइन देखील आहे. ज्यामुळे ती वापरण्यायोग्य आणि सुंदर बनते. चिवट डागांना काढणारे स्टेन क्लीन सारखे विशेष मोड आणि ड्युव्हेट मोड यांमुळे धुण्यास कठिण वाटणारे कपडे किंवा वस्तू सहजच धुतल्या जातात. नवीन टॉप लोड सिरीजसाठी विकसित केलेला मोठा 11 किलो ड्रम आणि एक आकर्षक फ्लॅट डिझाइनसह, कार्यक्षमता, डिझाइन आणि प्रत्यक्ष अनुभवानुसार काम यांचे संतुलन योग्य पद्धतीने राखतो.
AIDD 2.0 वॉशिंग मशीन 11 kg ते 20 kg क्षमतेतील विविध SKUs मध्ये आणि प्रीमियम रंग पर्यायांसह उपलब्ध असतील. हे मॉडेल प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म, ऑफलाइन रिटेल आउटलेट्स आणि LG ब्रँड स्टोअर्समध्ये उपलब्ध राहतील, तसेच आकर्षक कॅशबॅक आणि विशेष वित्तीय ऑफर देखील मिळतील. फ्रंट-लोड रेंजची किंमत ₹69,990 ते ₹1,39,990 दरम्यान आहे, तर टॉप-लोड रेंजची किंमत ₹38,990 ते ₹46,990 दरम्यान आहे.
Ans: AI DD 2.0 तंत्रज्ञान कपड्यांचा प्रकार, वजन आणि फॅब्रिकची सॉफ्टनेस ओळखून योग्य वॉश मोड निवडते, ज्यामुळे कपड्यांचे आयुष्य वाढते आणि नुकसान कमी होते.
Ans: Direct Drive मोटर अधिक शांत, व्हायब्रेशन कमी आणि टिकाऊ असते. यामुळे कमी ऊर्जा वापरून दीर्घकाळपर्यंत परफॉर्मन्स मिळतो.
Ans: TurboWash तंत्रज्ञान पाणी आणि डिटरजंट जलद फॅब्रिकमध्ये पोहोचवते, ज्यामुळे कमी वेळेत अधिक चांगले धुण्याचे परिणाम मिळतात.