
Confer Launch: डेटा लीकची भीती संपली! Signal फाऊंडरने लाँच केला जगातील सर्वात सुरक्षित AI चॅटबोट, प्रायव्हसीवर असणार फोकस
एका ब्लॉग पोस्टमध्ये मार्लिंसपाइक यांनी सांगितलं आहे की, Confer सोबत केलेले संभाषण पूर्णपणे एन्क्रिप्टेड असणार आहे, ज्यामुळे दुसरे कोणीही हे संभाषण पाहू शकणार नाही. याशिवाय, AI चॅटबॉट तुमचे मेसेज वाचू शकत नाही, त्यांचा वापर ट्रेनिंगसाठी केला जाऊ शकत नाही, तसेच मेसेज कोणीही इतर पाहू शकत नाही, ज्यामध्ये होस्ट, थर्ड पार्टी आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींचा समावेश आहे. सिग्नलचे फाउंडर म्हणाले की, Confer डेव्हलप करण्यामागील कारण असं आहे की, जर चॅटजीपीटी किंवा जेमीनी सारख्या चॅट इंटरफेसमध्ये ‘दोन लोकांमधील खाजगी संभाषण’ दाखवले असेल, तर ते प्रत्यक्षात दोन लोकांमधील खाजगी संभाषण असले पाहिजे, इंटरफेसखाली अज्ञात लोकांसोबतचे ‘ग्रुप चॅट’ नसावे. (फोटो सौजन्य – confer)
Confer मध्ये कोणत्या मोठ्या लँग्वेज मॉडेलचा वापर केला जातो, याबाबत मार्लिंस्पाइकने अद्याप काहीही सांगितलं नाही. मात्र सिग्नलवर TIME ला दिलेल्या संदेशात, मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक म्हणाले की AI चॅटबॉट्स वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे मॉडेल वापरतात. ज्यामध्ये एडवांस्ड मॉडेल केवळ प्रीमियम सब्सक्राइबरसाठी आहे. त्यांनी पुढे सांगितलं आहे की, मला आशा आहे की आपल्याला मॉडेल्स निवडण्याचे किंवा विचार करण्याचे ओझे लोकांवर टाकावे लागणार नाही, जसे सिग्नल लोकांना [क्रिप्टोग्राफिक] सायफर निवडण्याचे ओझे देत नाही.
जेव्हा तुम्ही Confer साठी साइन अप करता, तेव्हा AI चॅटबॉट तुम्हाला पासवर्ड सेट करण्यासाठी सांगणार नाही. तर याऐवजी ऑटोमॅटिकली एक पासकी सेट केली जाणार आहे. पासकी एन्क्रिप्शनव्यतिरिक्त, AI चॅटबॉट सर्वर एन्क्रिप्शन आणि वेबऑथन पीआरएफ एक्सटेंशनचा देखील वापर केला जातो, ज्यामध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन प्राइवेट की आणि लोकल डिव्हाईसवर आधारित असते. Confer एका वेगळ्या ठिकाणी देखील काम करतो, ज्याला ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायर्नमेंट म्हटलं जातं.
Ans: AI डेटा, अल्गोरिदम आणि मशीन लर्निंगच्या मदतीने पॅटर्न ओळखतो आणि त्यावरून उत्तर किंवा निर्णय देतो.
Ans: मुख्यतः Narrow AI (विशिष्ट कामांसाठी), General AI (मानवासारखी बुद्धिमत्ता – अजून विकसित होत आहे) आणि Super AI (सैद्धांतिक संकल्पना).
Ans: मोबाईल असिस्टंट, चॅटबॉट्स, हेल्थकेअर, बँकिंग, शिक्षण, वाहनं, सोशल मीडिया आणि ई-कॉमर्समध्ये AI मोठ्या प्रमाणात वापरला जातो.