Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण

Samsung Galaxy S25 plus: स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट झाल्याची आणखी एक घटना घडली आहे. हा ब्लास्ट Samsung Galaxy S25+ स्मार्टफोनमध्ये झाला आहे. या ब्लास्टचे कारण अद्याप समोर आले नसून कंपनी या प्रकरणाचा तपास करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2026 | 11:27 AM
चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण

चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:
  • Samsung फोन ठरतोय धोकादायक?
  • Samsung Galaxy S25+ चार्ज होत असताना फुटला
  • Galaxy S25+ स्फोटावर कंपनीची प्रतिक्रिया
अलीकडेच Samsung Galaxy S25 Plus स्मार्टफोन चार्जिंग दरम्यान ब्लास्ट झाल्याची एक घटना घडली होती. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या घटनेनंतर यूजर्समध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले. अनेक यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेचे फोटो पुन्हा शेअर करत कंपनीला टॅग केलं होतं आणि या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाबाबत कंपनीने अखेर प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी, असे वृत्त समोर आले होते की सॅमसंगच्या फायर अँड मरीन इन्शुरन्स टीमने या घटनेत बाधित झालेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 45,000 रुपये भरपाई देऊ केली आहे. सॅमसंग फोनच्या स्फोटात एका मुलासह कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले. या प्रकरणाबाबत चे कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने एक निवेदन जारी केले आहे.

Tech Tips: एक क्लिक… आणि सगळं गायब! फोन Factory Reset कधी करावा? तुमचे एक पाऊल ठरू शकते मोठी चूक

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमेरिकेतील इंडियानामध्ये राहणाऱ्या एका यूजरने दावा केला होता की, Samsung Galaxy S25 Plus रात्री चार्जिंगला लावला होता. पण चार्जिंगदरम्यान स्मार्टफोन आणि चार्जिंग केबल दोन्हीमध्ये ब्लास्ट झाला. या ब्लास्टमुळे घरात असलेल्या कार्पेटला आग लागली आणि क्षणातच संपूर्ण घरामध्ये धूर झाला. त्यामुळे कुटूंबातील सदस्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. या घटनेत एका मुलासह कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले. यूजरने दावा केला आहे की, त्याने कंपनीकडे सर्व डॉक्युमेंट्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये लोकल फायर डिपार्टमेंटचा रिपोर्ट देखील समाविष्ट आहे.  (फोटो सौजन्य – X)

यूजर त्याचा फोन कंपनीच्या ओरिजिनल चार्जरने चार्ज करत होता. हे सिद्ध करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रं देखील कंपनीकडे सोपवण्यात आली आहेत. यूजरने हा चार्जर एका महिन्यापूर्वी खरेदी केला होता. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये घडली होती आणि यूजर दोन महिन्यांपासून या प्रकरणाबाबत कंपनीशी संपर्कात होता. आता अखेर या प्रकरणाबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे.

दमदार फीचर्ससह Moto Watch भारतात लाँच! अ‍ॅडवांस्ड स्लीप ट्रॅकर आणि OLED डिस्प्लेने सुसज्ज, इतकी आहे किंमत

कंपनी काय म्हणाली?

अँड्रॉइड अथॉरिटीने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेतील प्रवक्ताने सांगितलं आहे की, आमच्या लाखो सॅमसंग डिव्हाईसची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अत्यंत काळजी घेतो. आमच्या तपासात या घटनेचे विशिष्ट कारण आढळलेले नाही. आम्ही यूजरसोबत संपर्कात आहोत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. याशिवाय रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने स्मार्टफोनची किंमत, मालमत्तेचे नुकसान आणि वैद्यकीय तपासणीशी संबंधित अतिरिक्त खर्च देण्यास सहमती दर्शविली आहे. सॅमसंगने असेही स्पष्ट केले की हे एक वेगळे प्रकरण आहे आणि कंपनीला गॅलेक्सी S25 लाइनअपवर परिणाम करणारी कोणतीही व्यापक समस्या आढळलेली नाही. त्यामुळे यूजर्सना चिंता करण्याची गरज नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Samsung फोन चार्जिंगदरम्यान गरम होणं नॉर्मल आहे का?

    Ans: होय, थोडं गरम होणं नॉर्मल आहे. पण फोन खूप जास्त तापत असेल, हाताला धरवत नसेल किंवा वास/आवाज येत असेल तर लगेच चार्जिंग बंद करा.

  • Que: Samsung बॅटरी किती वर्ष टिकते?

    Ans: 2–3 वर्षे किंवा 500–800 चार्ज सायकल्स.

  • Que: फास्ट चार्जिंग बॅटरी खराब करते का?

    Ans: नाही. Samsung ची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी बॅटरी प्रोटेक्शनसह येते, जर ओरिजिनल चार्जर वापरला तर सुरक्षित आहे.

Web Title: Samsung galaxy s25 plus smartphone blast during charging photos viral on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Samsung India: सॅमसंग व्हिजन AI टीव्हीवर ऑफर्सचा पाऊस! मोफत साऊंडबार, TV आणि ३६ महिन्यांचा सुलभ EMI
2

Samsung India: सॅमसंग व्हिजन AI टीव्हीवर ऑफर्सचा पाऊस! मोफत साऊंडबार, TV आणि ३६ महिन्यांचा सुलभ EMI

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
3

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
4

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.