सध्या सर्वत्र माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेसाठी राज्यातील हजारो महिलांनी आपले अर्ज भरले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
विशेष म्हणजे सरकार या योजनेअंतर्गत पहिला हफ्ता रक्षाबंधनाच्या दिवशी देणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकार आता त्याआधीच बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधीच रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. राज्यात 1 2024 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. या योजेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरु असून याची शेवटची तारीख 31 ऑगस्टपर्यंत आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार असल्याची माहिती आहे.
हेदेखील वाचा – लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीत तुमचे नाव आहे की नाही, ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. ज्या महिलांनी योजनेंतर्गत अर्ज केले आहेत, त्या महिला या योजनेशी संबंधित त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात. योजनेच्या लाभार्थींनी यादीत आपले नाव आहे की नाही तपासण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्यात.
याअंतर्गत जर लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यात तुम्हाला पैसे पाठवले जातील मात्र जर तुमचे नाव या यादीत नसले तर तुम्हाला या योजनेचा ;लाभ घेता येणार नाही.