'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन (Photo Credit- Social Media)
तुमचं नाव जर लाडकी बहीण योजना या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता याच महिन्यात मिळणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण 1500 ते 3000 रुपये पात्र लाभार्थी महिलांना डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षबंधनाच्या दिवशी पाठवणार होती, पण आता याचसंदर्भात बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज (7 ऑगस्ट) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे. 17 ऑगस्टलाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. 19 ऑगस्टला रक्षाबंधन येत आहे. मात्र योजनेचा पहिला आठवडा 17 तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पाठवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा: आता झाड तोडल्यास भरावे लागतील 50 हजार रुपये, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात 13 महत्त्वाच्या निर्णय
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिल्या आठवड्यात 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा केले जातील. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांची जमा झालेली रक्कम मिळणार आहे. विशेषत: या योजनेचे पैसे मिळण्यासाठी महिलांना जास्त वाट पाहावी लागणार नाही हे स्पष्ट झाले आहे. 17 ऑगस्ट रोजी सरकारने पैसे वाटपाच निर्णय घेतला.