कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. या राड्यातून जोरदार दगडफे करण्यात आली. दोन गटातील या धुमश्चक्रीत काहीजण जखमी तर मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. या राड्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारण काय?
पुढे आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात रात्री दोन समाजात वाद झाला आहे. उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड, लाईट्सचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून वाद निर्माण झाला. या वादातून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन गटातील या मश्चक्रीत काहीजण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सुमारे तासभर दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक सुरू झाल्याने या परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिसांनी बंदोबस्तात हा राडा थांबवण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.
पोलीस असल्याचे भासवत दिवसाढवळ्या अपहरण; पाचगणीत बंदुकीचा धाक दाखवत तडजोड
थंड हवेचे पर्यटनस्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला पोलीस असल्याचे भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, शिवीगाळ आणि मारहाण केली. यानंतर पीडित शेडगे यांना मुंबईत नेऊन रात्रीभर कैद करून “वाद मिटवा, नाहीतर जेलमध्ये टाकू” अशी धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेण्यात आला. या प्रकरणी भरत घरतसह चौघांविरोधात अपहरण, मारहाण आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील भोसे येथील संतोष लक्ष्मण शेडगे यांचे १७ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिवॉल्व्हरच्या धाकावर अपहरण करण्यात आले.शेडगे यांच्या प्लॉट क्रमांक ५९ समोर त्यांच्या गाडीला अडवून पाच अनोळखी इसमांनी स्वतःला नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगितले. “तुझ्यावर अटक वॉरंट आहे” अशी धमकी देत आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. धमकी देत आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. गाडी महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडे नेण्याऐवजी त्यांनी ती थेट पोलादपूरमार्गे मुंबईकडे वळवली. या प्रकरणी भरत घरतसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महाबळेश्वर पोलीस करत आहेत.
Beed Crime News: आधी हत्या नंतर विल्हेवाट; CCTV मुळे हत्या उघड,अखेर महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा