सोशल मीडियावरील नामांकित ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स पैकी व्हॉट्सॲप एक आहे. व्हॉट्सॲप वर यूजर्स सहजपणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपला संदेश पाठवू शकतात. स्वतःचा प्रोफाइल फोटो ठेवण्यापासून ते दूरच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल कारण्यापर्यंत मेटा कंपनी युजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असते. त्यातच आता व्हॉट्सॲप बद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता व्हॉट्सअॅप कंपनीने त्यांचे ‘डिलीट फॉर मी’ या फीचरमध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे.
व्हॉट्सॲपवर अनेकदा चॅट्स करताना वा फोटो शेअर करताना आपला मेसेज दुसऱ्याच व्यक्तीला अथवा ग्रुपला जातो. अशा वेळेस मग तो मेसेज कोणी बघायच्या आधी डिलीट करावा लागतो. हा मेसेज डिलीट करताना व्हॉट्सॲप आपल्याला दोन पर्याय सुचवते. पहिला ‘डिलीट फॉर मी’ तर दुसरा ‘डिलीट फॉर एव्हरीवन’.पण, अनेकदा घाई घडबडीत आपल्याकडून ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ ऐवजी ‘डिलीट फॉर मी’ क्लिक होऊन जाते. या पर्यायावर चुकून क्लिक केल्यास केल्यावर तो मेसेज फक्त आपल्याकडून डिलीट होतो. मात्र दुसऱ्या व्यक्तीला तो मेसेज दिसत असतो तर आता तुम्हाला यासाठी चिंता करण्याची गरज नाहीये. कारण आता व्हॉट्सॲप लवकरच एक नवीन फीचर घेऊन येत आहे.
[read_also content=”NASAरेल्वे पोहचणार चंद्रावर! NASA ची तयारी सुरु, लुनार रेल्वेचा उपयोग कसा होणार जाणून घ्या https://www.navarashtra.com/technology/the-train-will-go-to-the-moon-nasas-preparation-begins-know-how-the-lunar-railway-will-be-used-533483.html”]
व्हॉट्सॲपचे नवीन फीचर कसे काम करेल ते जाणून घेऊयात
व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरचे नाव असणार आहे “Undo डिलीट फॉर मी” (Undo Delete for me). म्हणजे काय तर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकीचा मेसेज पाठवला आणि डिलीट करताना चुकून तुम्ही ‘डिलीट फॉर मी’ वर क्लिक केले तर तिथे तुम्हाला एक पर्याय दिसेल ‘मेसेज डिलीट फॉर मी’ आणि त्याच्या पुढे ‘Undo’ असे लिहिलेले असेल. तर ‘Undo’ वर क्लिक केल्यास तुम्हाला तो मेसेज पुन्हा ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ करण्याची आणखीन एक संधी मिळणार आहे.
व्हॉट्सॲपवर हे फीचर कधीपासून चालू होईल याची अधिकृत माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. मात्र, व्हॉट्सॲपच्या अधिकृत अकाउंटवरून फीचर बद्दल सविस्तर माहिती, नवीन फीचर कसं वापरायचं याचा एक डेमो व्हिडिओ ( Demo Video) शेअर करण्यात आला आहे. तर आता लवकरचं व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट होईल आणि युजर्स याचा उपयोग लवकरच करू शकतील. चुकून मेसेज डिलीट फॉर मी झाल्यावर अनेकांची तारांबळ उडायला लागते. तर हे नवीन फीचर आपल्या सगळ्यांचीच या चिंतेतून मुक्तता करेल.