फोटो सौजन्य- pinterest
आजचा शनिवारचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे. प्रत्येक अंकांचा स्वामी ग्रह असतो. तसा आज 5 अंकांचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुधाचा प्रभाव राहील. आजच्या शनिवारचा दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे. शनिचा अंक 8 मानला जातो. तर मूलांक 5 असलेल्या लोकांना जुने मित्र भेटू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही दिवसभर खुश रहाल आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर कामात अडथळा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्याना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत आजचा वेळ चांगला जाईल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आई वडिलांचा पाठिंबा मिळेल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जुने मित्र भेटू शकतात. तुमचा दिवस आनंदात जाईल. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.
मूलांक 6 असलेल्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. त्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावरील तणाव दूर होईल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होतील.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर फायदा होईल. समाजामध्ये मान सन्मान मिळेल. व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ मिळतील. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस आज चांगला राहील.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. घरात शुभ कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसायात अपेक्षित लाभ होऊ शकतात. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)