फोटो सौजन्य- istock
भाद्रपद महिन्यातील अमावस्येला हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे स्थान आहे. यालाच पिठोरी अमावस्या किंवा कुशोत्पत्नी असे देखील म्हटले जाते. यावेळी या अमावस्येची सुरुवात शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.55 वाजता होणार आहे आणि याची समाप्ती शनिवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11. 35 वाजता होईल.
या दिवशी नदीमध्ये स्नान, दान, तर्पण आणि पितृपूजेला विशेष महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, अमावस्येला राशीनुसार काही विशेष उपाय केल्याने पितृ दोष, शनि दोष आणि कालसर्प दोष यासारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते, त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. भाद्रपद अमावस्येला राशीनुसार कोणते उपाय करावे, जाणून घ्या
भाद्रपद अमावस्येला मेष राशीच्या लोकांनी सूर्योदयापूर्वी स्नान करुन तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे. पाणी अर्पण करताना ॐ सूर्याय नमः या मंत्रांचा जप करावा.
वृषभ राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर गरजूंना अन्नाचे वाटप करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी त्यासोबतच तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. त्यानंतर ॐ नमो नारायणाय या मंत्रांचा जप करुन तिळाचे दान करावे.
कर्क राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी चंद्राला दुधात मिसळलेले पाणी अर्पण करावे आणि ॐ सोमय नमः या मंत्रांचा जप करावा. त्यासोबतच पांढरे कपड्याचे दान करावे.
अमावस्येच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची पूजा करावी आणि ॐ घृणी सूर्याय नमः या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर वाहत्या पाण्यात तांब्याचे नाणे अर्पण करावे.
कन्या राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करावी. ॐ गं गणपतये नमः या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर काळे तीळ आणि मोहरीचे तेलाचे दान करा.
तूळ राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी अर्पण करावे. ॐ शुक्राय नमः या मंत्रांचा जप करुन गरिबांना तांदूळ दान करावे.
अमावस्येच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा करावी आणि हनुमान चालिसाचे पठण करावे. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि काळ्या कपड्याचे दान करावे.
धनु राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करावी. त्यासोबतच ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. तसेच पिवळे कपडे किंवा हळदीचे दान करावे.
मकर राशीच्या लोकांना अमावस्येच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ॐ शनैश्चराय नमः या मंत्रांचा जप करावा. या लोकांनी लोखंडाच्या वस्तू दान कराव्यात.
कुंभ राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी नीलम रत्न परिधान करावे. त्यानंतर शनिदेवाची पूजा करुन ॐ शं शनैश्चराय नमः या मंत्रांचा जप करावा. काळे तीळ आणि उडीद डाळ दान करा.
अमावस्येच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी भगवान शिव यांना दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर ॐ नमः शिवाय या मंत्रांचा जप करुन पाण्यात काळे तीळ अर्पण करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)