
Meta ने आणले स्मार्ट ग्लासेस; फोटो अन् व्हिडिओही आता काढता येणार
नवी दिल्ली : सध्या अनेक टेक्नॉलॉजी समोर येत आहे. त्यातच मेटाने आपला नवीन एआय-सक्षम स्मार्ट ग्लासेस, ‘रे-बॅन मेटा ऑप्टिक्स स्टाईल्स’ लाँच केला आहे. हे स्मार्ट ग्लासेस कंपनीचे, चष्म्याच्या नंबरवर वापरण्यासाठी डिझाइन केलेले पहिले ऑप्टिकल स्टाईल्स आहेत. हे ग्लासेस एस्सिलॉरलक्सोटिकाच्या पार्टनरशिपमध्ये आणला गेला आहे. हे ग्लासेस आरामदायी आणि गरजेनुसार बदल करता येतील अशाप्रकारे डिझाईन केलेले आहेत.
या फ्रेम्समध्ये अधिक स्लिम डिझाइन, बदलता येणारे नोज पॅड्, अतिरिक्त १० अंशांच्या रोटेशनसह ओव्हरएक्सटेन्शन हिंज आणि चांगल्या फिटसाठी अॅडजस्टेबल टेम्पल टिप्स आहेत. ब्लेझर ऑप्टिक्स आणि स्क्रायबर ऑप्टिक्स या दोन्ही फ्रेम्स सिंगल-व्हिजन, प्रोग्रेसिव्ह आणि ट्रान्झिशन लेन्ससह विविध प्रकारच्या लेन्सना सपोर्ट करतात. ग्राहकांना फ्रेम न बदलता घरातील आणि बाहेरील वातावरणात बदल करू शकतात.
6-मायक्रोफोन सिस्टीम
या स्मार्ट ग्लासेसमध्ये 12-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे जो 3K रिझोल्यूशनमध्ये फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकतो. यात उत्तम ऑडिओ रेकॉर्डिंग आणि अधिक स्पष्ट कॉल्ससाठी ६-मायक्रोफोन सिस्टीम देखील आहे. युजरला स्पॉटिफायू आणि अॅमेझॉन म्युझिकसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे गाणं आणि पॉडकास्ट ऐकू शकता येते. तसेच तुम्ही कॉलही करू शकता. मेसेज पाठवू शकता आणि 1 MIG व्हॉइस कमांडद्वारे मेटा एआयशी संवाद साधू शकता.
कंपनीकडून दिले गेले अॅक्शन बटण
यात एक अॅक्शन बटण देखील आहे जे मेटा एआयला त्वरित अॅक्सेस देते, ज्यामुळे वापरकर्ते कंटेंट कॅप्चर करू शकतात किंवा शॉर्टकट पटकन अॅक्टिव्हेट करू शकतात. एआय असिस्टंट ग्राहकांनी पाहिलेल्या माहितीच्या आधारे संदर्भ समजू शकतो, प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो आणि मदत करू शकतो.
गॅझेट्समुळे आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक सोपे
स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच या गॅझेट्समुळे आपले आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. कॉलिंग, मेसेजिंग, ऑफिस मीटिंग, फोटोग्राफी अशी अनेक काम आपण स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण करू शकतो. तर स्मार्टवॉच कॉलिंग आणि मेसेजिंगसह हेल्थ मॉनिटर करते. यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी अपडेट्स सतत मिळत असतात. पण तुम्हाला माहिती असेल या गॅझेट्समुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो. या डिव्हाईसोबत स्मार्ट टीव्ही देखील असे एक गॅझेट आहे, ज्याचा तुमच्या प्रायव्हसीवर परिणाम होतो. स्मार्ट टिव्ही तुमचे संभाषण ऐकू शकते. इतकंच नाही तर तुमचं लोकेशन देखील शेअर करू शकते.