आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे होणार Ray-Ban Meta Glasses ची विक्री, 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Ray-Ban Meta Glasses चे फीचर्स वाचून व्हाल हैराण
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे खरेदी करा स्मार्ट ग्लासेस
ऑफर्स आणि डिव्हाईसनंतर कमी झाली किंमत
Ray-Ban Meta Glasses आता भारतातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. आता या डिव्हाईसची विक्री भारतात ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे केली जाणार आहे. EssilorLuxottica च्या सहकार्याने डेव्हलप करण्यात आलेले स्मार्ट ग्लासेस मे महिन्यात भारतात लाँच करण्यात आले. मात्र त्यावेळी हे डिव्हाईस केवळ Ray-Ban.com आणि भारतातील प्रमुख ऑप्टिकल आणि सनग्लासेस स्टोअर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध होते. मात्र आता या डिव्हाईसची विक्री अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे देखील केली जाणार आहे.
Ray-Ban Meta Glasses भारतात 29,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. ही किंमत डिव्हाईसच्या स्कायलर आणि Wayfarer च्या शायनी ब्लॅक कलर ऑप्शनसाठी आहे. जर तुम्ही 20 टक्के डिस्काऊंट आणि ऑफर्ससह या डिव्हाईसची खरेदी केली तर स्मार्ट ग्लासेसची किंमत 23,920 रुपये होते. ग्राहक अनेक फ्रेम स्टाइल्स आणि प्रिस्क्रिप्शन, सन, पोलराइज्ड आणि ट्रांजिशन लेंस ऑप्शन्समधून एक निवड करू शकतात. ग्राहक अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट आणि रिलायंस डिजिटलद्वारे Ray-Ban Meta ग्लासेस खरेदी करू शकणार आहेत. हे ग्लासेस भारतातील मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या कंपनीच्या धोरणाचा एक भाग आहे. (फोटो सौजन्य – X)
Ray-Ban Meta Glasses मध्ये 12-मेगापिक्सेल कॅमेरा आणि एक LED लाइट देण्यात आली आहे, जी फ्रेमच्या दोन्ही बाजूला गोल कटआउटच्या आतमध्ये असल्याची पाहायला मिळत आहे. हे LED लाइट व्हिडीओ रेकॉर्डिंगदरम्यान इंडिकेटरच्या रुपात काम करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट ग्लासेस 3,024 x 4,032 पिक्सेलपर्यंत फोटो कॅप्चर करू शकतात आणि 1080p व्हिडीओ 60 सेकंदपर्यंत रेकॉर्ड करू शकतात. Meta ने सांगितलं आहे की, या डिव्हाईसने रेकॉर्ड केलेले व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या मेटा अॅप्सवर शेअर केले जाऊ शकतात. यूजर्स मेटा व्ह्यू अॅपद्वारे ते इतर प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करू शकतात.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Ray-Ban Meta Glasses मध्ये याचे प्रोपाइअटरी Meta AI असिस्टेंट उपलब्ध आहे. यूजर्स ‘Hey Meta AI’ बोलून अनेक हँड्स-फ्री अॅक्शन ट्रिगर करू शकतात. स्मार्ट ग्लास इंग्लिश आणि स्पॅनिश, फ्रेंच किंवा इटॅलियनदरम्यान रियल-टाइम स्पीच ट्रांसलेशनची सुविधा देतात, ज्यामध्ये यूजर्सना केवळ ‘हे मेटा, स्टार्ट लाइव ट्रांसलेशन’ असं बोलावं लागणार आहे. ट्रांसलेटेड ऑडियो ओपन-ईयर स्पीकर्सद्वारे प्ले होतो आणि त्याचे ट्रांसक्रिप्शन देखील पाहिले जाऊ शकते.
Ray-Ban Meta Glasses, Qualcomm च्या Snapdragon AR1 Gen1 Platform प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि यामध्ये 32GB ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. स्मार्ट ग्लासेज एकदा फुल चार्ज झाल्यानंतर चार तासांचा बॅटरी लाईफ ऑफर करतात. चार्जिंग केस एकूण 32 तासांची बॅटरी लाइफ देते. ते स्प्लॅश-प्रतिरोधक देखील आहेत आणि त्यांना IPX4 रेटिंग आहे.
Ans: होय. यात 12MP कॅमेरा असून तुम्ही फोटो आणि 1080p व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.
Ans: होय, तुम्ही Facebook किंवा Instagram वर Direct Live Stream करू शकता.
Ans: साधारणपणे 32GB स्टोरेज मिळते (मॉडेलनुसार बदलू शकते).






