Flipkart Big Billion Days 2025: तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या नवा फोल्डेबल फोन, असा घ्या बंपर ऑफरचा फायदा
गेल्या दोन दिवसांपासून सर्वांना फ्लिपकार्टचे वेड लागले आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग बिलीयन डेज सेलमधून प्रत्येकजण त्यांच्या गरजेची वस्तू खरेदी करत आहेत. फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेलमध्ये फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेस आणि स्मार्टफोनसह इतर वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे. यावेळी कंपनीने त्यांच्या सेलमध्ये स्मार्टफोनवर सर्वाधिक भर दिलं आहे. सेलमध्ये अनेक स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण नवीन स्मार्टफोन खरेदी करत आहेत.
महागडे आणि प्रिमियम स्मार्टफोन देखील सेलमध्ये मिड रेंज किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे किंवा त्यांचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. सेलमध्ये उपलब्ध असणारी एक आकर्षक स्मार्टफोन डिल म्हणजे Motorola Razr 60. हा फोल्डेबल स्मार्टफोन यावर्षी लाँच करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनवर सेलमध्ये आकर्षक डिस्काऊंट उपलब्ध आहे. त्यामुळे हा महागडा स्मार्टफोन देखील कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेलमध्ये Motorola Razr 60 स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. सेलमध्ये Motorola Razr 60 ची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना फोल्डेबल स्मर्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे. चला तर मग Motorola Razr 60 वरील ऑफरबद्दल जाणून घेऊया.
Motorola Razr 60 स्मार्टफोन भारतात 49,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा फ्लिप-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ 39,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ई-कॉमर्स कंपनी त्यांच्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान या फोनवर 10,000 रुपयांचे फ्लॅट डिस्काउंट ऑफर करत आहे. शिवाय, तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी बचत करता येते. काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होते.
Motorola Razr 60 मध्ये 6.96-इंचाचा pOLED इनर डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन आहे. बाहेरील बाजूस 3.63-इंच pOLED कवर स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 1,700 nits पीक ब्राइटनेस आहे.
फोन MediaTek Dimensity 7400X चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये 4,500mAh बॅटरी आहे, जो 30W चार्जिंग सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP मेन कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.