Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स
Oppo A6 Pro स्मार्टफोन वियतनाममध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हीटीसोबत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मिडरेंज किंमतीत लाँच केला आहे. Oppo A6 Pro स्मार्टफोन Oppo A6 सीरीजचे एक नवीन एडिशन आहे, ज्यामध्ये आतापर्यंत Oppo A6 Pro 5G, Oppo A6 GT आणि Oppo A6i सारख्या 5G मॉडल्सचा समावेश आहे. आता या सिरीजमधील आणखी एक नवीन डिव्हाईस कंपनीने लाँच केलं आहे.
नवीन हँडसेटमध्ये 7,000mAh बॅटरीसह 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनच्या 5G वर्जनसारखेच आहेत. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A6 Pro 4G ला डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शनसाठी IP69 रेटिंग मिळाली आहे. (फोटो सौजन्य – X)
Oppo A6 Pro 4G ची किंमत वियतनाममध्ये VND 8,290,000 म्हणजेच सुमारे 27,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम+ 256GB स्टोरेज मॉडलमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन कोरल पिंक, लूनर टाइटेनियम, रोजवुड रेड आणि स्टेलर ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे.
Oppo A6 Pro 4G मध्ये 6.57-इंच Full-HD+ (1,080×2,372 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 1,400 nits पर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेवर AGC DT-Star D+ प्रोटेक्शन आहे. हा फोन MediaTek Helio G100 चिपसेटवर चालतो. ज्याला 8GB LPDDR4x रॅमसह जोडण्यात आला आहे. यामध्ये 128GB आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे. फोन Android 15-बेस्ड ColorOS 15 वर आधारित आहे.
फोटोग्राफीसाठी Oppo A6 Pro 4G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम सेंसर आहे. फ्रंटला 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे, जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आहे. हँडसेटमध्ये SuperCool VC सिस्टम देण्यात आला आहे, ज्यामध्ये 4,300 sq mm वेपर कूलिंग चेंबरचा समावेश आहे. फोनमध्ये AI GameBoost 2.0 देखील आहे, जे ग्राफिक्सला गुळगुळीत करते, जलद प्रतिसाद देते आणि वापरकर्त्याच्या खेळण्याच्या शैलीनुसार गेमिंग अनुभव वैयक्तिकृत करते.
Oppo A6 Pro 4G मध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीमध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट आहे. सिक्योरिटीसाठी Oppo A6 Pro 4G मध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनला IP69 रेटिंग देण्यात आले आहे. त्याची लांबी 158.20×75.02×8.00 मिमी आणि वजन सुमारे 188 ग्रॅम आहे.