Free Fire Max: क्षणार्धात होईल तुमच्या शत्रूचा खात्मा, गेम खेळताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स!
फ्री फायर मॅक्स हा एक लोकप्रिय गेम असून त्याचे युजर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. बऱ्याच काळापासून गेम खेळणारे प्रो प्लेअर्स या गेममध्ये अगदी सहज टिकून राहतात आणि त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवतात. मात्र हा गेम खेळणारे नवीन प्लेअर्स गेममध्ये टिकून राहण्यासाठी बराच प्रयत्न करत असतात. नवीन प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवणं कठीण जातं. यासाठी नवीन प्लेअर्ससाठी काही खास टिप्स घेऊन आम्ही आलो आहोत. या टिप्सच्या मदतीने प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे प्लेअर्स अगदी सहज गेममध्ये विजय मिळवू शकतात.
जर तुम्ही नवीन प्लेअर असाल तर लँडिंगकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा प्लेअर्स जास्त लूटसाठी अशा एखाद्या ठिकाणीची निवड करतात, जिथे आधीपासूनच बरेच प्लेअर्स असतील. त्यामुळे गेममध्ये जास्त काळ टिकून राहण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड करणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्लेअर्सना लूटमध्ये मिळालेल्या गन आणि मेडिकल किटचा योग्य प्रकारे वापर करणं आवश्यक आहे. त्यांनी शक्य तितक्या आवश्यक वस्तू नंतरसाठी साठवून ठेवाव्यात जेणेकरून ते गेममध्ये जास्त काळ टिकू शकतील. कमी रिसोर्स वापरण्याचा प्रयत्न करा आणि गेमच्या सुरुवातीला कमी शत्रूंचा सामना करा.
नवीन प्लेअर्स सहसा शत्रूंचं लोकेशन ओळखण्यात चूक करतात. ही चूक टाळण्यासाठी चांगले गेमिंग हेडफोन वापरणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला शत्रूच्या दुखापती, गोळीबार आणि वाहनांचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात. उच्च-गुणवत्तेचे हेडफोन वापरल्याने तुमचा प्रतिक्रिया वेळ सुधारू शकतो.
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना गेमच्या सुरुवातीला सर्वाइव करणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वाइव करण्यासाठी तुम्हाला तुमच्या टिमसोबत मिळून खेळावे लागणार आहे. अन्यथा तुम्ही शत्रूच्या हल्ल्याचा शिकार होऊ शकता आणि गेममधून बाद होऊ शकता. यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, तुमची टिम. तुमच्या टीमशी चांगला संवाद ठेवा. ते तुमचे शत्रूंपासून संरक्षण करतीलच पण गेममध्ये पुढे जाण्यासही मदत करतील.
जर तुम्हाला गेममध्ये लवकरात लवकर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्ही गेममधील प्रत्येक झोन समजू शकता. बंदुकांसारख्या कॉस्मेटिक आइटमचा वापर कधी आणि कुठे करायचा हे देखील तुम्हाला शिकायला मिळेल, जे तुम्हाला एक चांगली रणनीती विकसित करण्यास मदत करेल.