13 वर्षांपूर्वी अपलोड केला पहिला YouTube Video! 14 वर्षांत उभं केलं1 बिलियन डॉलरचं विश्व, अशी आहे Mr Beast च्या यशाची कहाणी
जगभरात अनेक युट्यूबर्स आणि व्हिडीओ क्रिएटर आहेत. प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आहे. प्रत्येकाचा व्हिडीओ बनवण्याचा अंदाज अगदी निराळा असतो. या यूट्यूब आणि ऑनलाइन क्रिएशनच्या जगात एक नाव असं आहे ज्याने सर्वांच मन जिंकल आहे, हे नाव म्हणजे MrBeast. MrBeast म्हणजेच जिमी डोनाल्डसन. MrBeast एक लोकप्रिय युट्यूबर आहे आणि त्याने कमी वयातच फार मोठं यश गाठलं आहे. त्याच्या या यशाचं कौतुक संपूर्ण जगभरात केलं जात आहे.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामधून युट्यूब चॅनेलची सुरुवात करणारा MrBeast आज अब्जाधीशांच्या यादीमध्ये जोडला गेला आहे. “Celebrity Net Worth” ने दिलेल्या माहितीनुसार, MrBeast ची एकूण संपत्ती 1 बिलियन डॉलर झाली आहे. अशाप्रकारे, तो जगातील आठवा सर्वात तरुण अब्जाधीश बनला आहे. MrBeast असा पहिला व्यक्ति आहे ज्याने कोणत्याही वारसाशिवाय 30 वर्षांपेक्षा कमी वयात इतकी मोठी संपत्ती उभारली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
MrBeast ने वयाच्या 13 व्या वर्षी “MrBeast6000” नावाचा यूट्यूब चॅनेल सुरु केला होता. सुरुवातीला तो या चॅनेलवर गेमिंग व्हिडीओ, रिअॅक्शन आणि युट्यूबर्सची संपत्ती सांगणारे व्हिडीओ तयार करत होता. 2017 मध्ये त्याचा “I Counted to 100,000” हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शूट करण्यासाठी त्याला तब्बल 44 तासांचा कालावधी लागला होता. यानंतर त्याने चॅलेंज आणि गिवअवे स्टाईल व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. त्याचे हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आणि त्याला एक वेगळी ओळख मिळाली.
2023 मध्ये त्याने 223 मिलियन डॉलरची कमाई केली आणि 2024 मध्ये त्याची कमाई 700 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचली. यामध्ये त्याच्या बिझनेस वेंचर्सचा देखील समावेश आहे.
MrBeast Burger: एक वर्चुअल फास्ट फूड चेनची कमाई प्रति महिना 2.3 मिलियन डॉलर आहे.
Feastables: त्याची चॉकलेट कंपनी देखील आहे, जी लाँच होताच काही महिन्यांतच 10 मिलियन डॉलरपेक्षा जास्त विक्री केली.
Juice Funds: नवी क्रिएटर्सना सपोर्ट करण्यासाठी त्याने 2 मिलियन डॉलरचा फंड तयार केला. याशिवाय, तो क्रिप्टो आणि NFT मध्ये देखील गुंतवणूक करतो आणि कॉइनबेस सारख्या कंपन्यांशी संबंधित आहे.
MrBeast केवळ युट्यूब व्हिडीओच तयार करत नाही, तर त्याने Beast Philanthropy नावाने एक संस्था देखील सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत 100 हून अधिक गाड्या दान केल्या आहेत. तर एका व्हिडीओमध्ये त्याने 1 मिलीयन डॉलर देखील दान केले होते. “Team Trees” च्या मदतीने त्याने 2 करोड झाडं लावण्याचा उपक्रम देखील सुरु केला. 2023 मध्ये त्याने 1000 लोकांना मोफत सर्जरीसाठी मदत केली, यासाठी त्याला टीकेलाही सामोर जावं लागलं होतं. यावेळी MrBeast ने सांगितलं होतं की, मी मरण्यापूर्वी माझी सर्व संपत्ती दान करणार आहे.
MrBeast चे यूट्यूब चॅनल आता जगातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेले चॅनल बनले आहे. त्याने स्पॅनिश, फ्रेंच, अरबी इत्यादी 10 हून अधिक भाषांमध्ये डब केलेले त्याचे व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.