Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा YouTube वरून किती कमाई करायची? वाचून बसेल धक्का
ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा सध्या अडचणीत सापडली आहे. ‘Travel with Jo’ नावाच्या युट्यूब चॅनेलसाठी ज्योती मल्होत्रा ओळखली जाते. मात्र आता पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योतील अटक करण्यात आली आहे. हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ज्योतीवर आरोप करण्यात आले आहेत की ती भारतातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानातील एजेंसीला पाठवत होती. या आरोपांखाली ज्योतीला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरु आहे.
ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा करत होती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, पोलीस तपासात समोर आलं सत्य
हरियाणाच्या हिसार भागातील रहिवासी ज्योती सोशल मिडीयावर प्रचंड अॅक्टिव्ह होती. ती तिच्या फॉलोवर्ससोबत डेली अपडेट्स आणि ट्रॅव्हल व्हिडीओ शेअर करायची. तिच्या या व्हिडीओंना फॉलोवर्सकडून अगदी चांगला प्रतिसाद मिळत होता. काही दिवसांपूर्वीच ज्योतीने पाकिस्तानला भेट दिली होती. तिने तिचा हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर देखील केला होता. ज्योतीच्या या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले होते. आता जाणून घेऊया की ज्योती युट्यूब व्हिडीओवरून किती कमाई करत होती. (फोटो सौजन्य – instagram)
ज्योतिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी युट्यूबवर ट्रॅवल व्लॉगिंग व्हिडीओ शेअर करत होती. अलीकडेच ती दिल्लीहून हिसारला आली होती. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ती घरीच होती. त्यांनी सांगितलं की, गुरुवारी पोलीस घरी आले होते आणि ज्योतीचा मोबाईल, लॅपटॉप, पासपोर्ट आणि बँकसंबंधित डॉक्युमेंट्स घेऊन गेले.
ज्योतीच्या यूट्यूब चॅनल ‘Travel with Jo’ वर लाखो सबस्क्राईबर्स होते. ट्रॅवल व्लॉगिंगमुळे ज्योतीची कमाई देखील उत्तम होती. यूट्यूबवर प्रत्येक 1,000 व्यूजवर सुमारे 166 ते 996 रुपयांची कमाई होते. ज्योतीचा विचार केला तर तीच्या प्रत्येक व्हिडीओला 50,000 व्यूज सहज मिळत होते आणि ती महिन्याला 10 व्हिडीओ अपलोड करत होती. म्हणजेच दरमहिना ज्योतीला युट्यूबकडून 83,000 ते 4.98 लाख रुपयांपर्यंतची कमाई व्हायची.
याशिवाय ज्योती अनेक ब्रँड प्रमोशन देखील करत होती. ट्रॅवल व्लॉगर्सना ट्रॅवल गियर, होटल, एयरलाइंस आणि अॅप्सच्या प्रमोशनसाठी ऑफर मिळते. एका रिपोर्टनुसाार, ज्योती एक प्रमोशनल पोस्टसाठी 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंत चार्ज करत होती. जर तीने महिन्याला 2 ते 3 ब्रँड्स प्रमोशन केले तर ती 40,000 ते 1.5 लाखपर्यंतची कमाई आरामात करू शकत होती.
ज्योती महिन्याला 1.5 ते 4.98 लाखपर्यंतची कमाई करू शकत होती. जर तीन वर्षांचा विचार केला तर तिच्या अर्ध्या कमाईतून आतापर्यंत तिची बचत 27 ते 40 लाख रुपये असू शकते.