मुंबई एअरपोर्टकडून मल्टी-लेव्हल कार पार्किंग येथे कॅशलेस डिजिटल पेमेंट सिस्टमचा शुभारंभ, आता ऑनलाईन भरता येईल पार्किंग फीस
प्रवाशांना यूपीआय, डिजिटल वॉलेट्स, डेबिट/क्रेडिट कार्ड्स किंवा फास्टटॅग-आधारित ऑटोमॅटिक डिडक्शन्सच्या माध्यमातून सहजपणे पार्किंग फीस भरण्याची सुविधा मिळावी म्हणून मुंबई एअरपोर्टकडून कॅशलेस डिजिटल पेमेंट सिस्टीम लाँच करण्यात आली आहे. याच्या मदतीने वाहतूक प्रवाहामध्ये सुधारणा होईल आणि पार्किग स्लॉटमधून बाहेर पडण्यास होणारा विलंब कमी करता येईल ज्यामुळे प्रवाशांना जलद, कार्यक्षम व सोईस्कर पार्किंगचा अनुभव मिळण्यास मदत होईल.
स्मार्ट गतीशीलता आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA), मुंबईने विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता मल्टी-लेव्हल कार पार्किंग (MLCP) मध्ये प्रवेश करण्यासोबत बाहेर पडणे सोईस्कर करण्यासाठी ऑटोमेटेड डिजिटल पेमेंट सिस्टम सुरू करण्यात आली आहे. या कॅशलेस पेमेंट प्रक्रियेचा मूळ उद्देश पेमेंट सिस्टम सुव्यवस्थित करणे, वेटिंग टाइम कमी करणे आणि लोकांना त्रसमुक्त पार्किंग अनुभव देणे हा आहे.
या कॅशलेस उपक्रमामुळे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला चालना मिळते, ज्यामुळे एमएलसीपीच्या वापरकर्त्यांना मोबाइल वॉलेट्स, डेबिट/क्रेडिट कार्ड्स, यूपीआय किंवा इतर ऑनलाइन पेमेंट पद्धतींसारख्या विविध डिजिटल पर्यायांचा वापर करून पार्किंगसाठी पैसे भरता येतात. एमएलसीपीमधील सर्व ग्राहक मार्गांवर फास्टटॅग काउंटर्स आहेत, ज्यामुळे प्रवेश आणि निर्गमन जलदपणे होते. सीएसएमआयएच्या मल्टी-लेव्हल कार पार्किंग (MLCP) मधील फास्टटॅग युजर्स ऑटोमेटेड (Automated) पार्किंग प्रक्रियेचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे पावत्या किंवा रोख/कार्ड पेमेंट मिळवण्यासाठी मॅन्युअल हस्तक्षेपाची गरज भासणार नाही.
सध्या, सीएसएमआयएच्या एमएलसीपीमध्ये ६६ टक्के युजर्स त्यांच्या पेमेंटचा प्रायमरी मोड म्हणून फास्टटॅगचा वापर करतात, तर १०-१५ टक्के युजर्स यूपीआय, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पर्यायांचा वापर करतात, ५ टक्के प्री-बुकिंग पार्किंग स्लॉट्स आहेत. ८५ टक्के प्रवासी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत असल्याने सीएसएमआयए स्टेकहोल्डर्ससोबत सहयोग करून आणि ग्राहकांना ऑटोमेटेड (Automated) डिजिटल पेमेंट पद्धती स्वीकारण्यास प्रेरित करून कॅश पेमेंटचा वापर आणखी कमी करण्याचा प्रयत्न करते. मात्र कॅश पेमेंट देण्याचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना फक्त नियुक्त केलेल्या केंद्रीय पेमेंट स्टेशनवर पेमेंट करावे. एअरपोर्ट प्रवाशांना नवीन डिजिटल पेमेंट पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन करते.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत सीएसएमआयएचे प्रवक्ता म्हणाले, “मुंबई एअरपोर्ट स्मार्ट एअरपोर्ट सोल्यूशन्समध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहे, तसेच डिजिटल नाविन्यतेच्या माध्यमातून कार्यक्षमता, पारदर्शकता व स्थिरता वाढवत आहे. सीएसएमआयएच्या एमएलसीपी येथे डिजिटल पेमेंट सिस्टमच्या अवलंबनामधून आधुनिक, कार्यक्षम पार्किंग अनुभव देण्याप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते.”
टिप: कोणत्याही पेमेंट-संबंधित समस्यांसह फास्टटॅगसंदर्भातील समस्यांसाठी कृपया feedback.parking@adani.com येथे संपर्क साधा किंवा +९१ ७७१०८ ५५७३५ या क्रमांकावर कॉल करा.