(फोटो सौजन्य: Apple )
ॲपलचे बहुचर्चित आणि नवीनतम मॉडल iPhone 16e कंपनीने अखेर भारतात लाँच केले आहे. या फोनची प्री-बुकिंग आता सुरु करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 28 फेब्रुवारीपासून या नवीनतम स्मार्टफोनची विक्री सुरु करण्यात आली आहे. आहि तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन iPhone 16 सिरीजमधील सर्वात नवीन मॉडेल आहे. यात 6.1-इंच OLED स्क्रीन आणि A18 चिपसह Apple Intelligence फीचर्सचे सपोर्ट देण्यात आले आहे.
दरम्यान iPhone 16 ही सिरीज नेहमीप्रमाणे मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आली होती. त्यानंतर आता याचे नवीन मॉडेल लाँच झाले आहे. युजर्स या लाँचसाठी फार काळापासून उत्सुक होते. चला तर मग iPhone 16e भारतात कोणत्या किमतीत उपलब्ध आहे आणि यात कोणकोणते फीचर्स देण्यात आले आहेत ते जाणून घेऊया.
भारतात iPhone 16e ची काय किंमत काय?
भारतात iPhone 16e कोणत्या किमतीला लाँच केला गेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत. माहितीनुसार, 128GB स्टोरेज बेस मॉडेलची किंमत भारतात 59,900 रुपयांपासून सुरू होते. हा हँडसेट 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्यांची किंमत क्रमशः 69,900 आणि 89,900 रुपये आहे. iPhone 16e च्या प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या आणि आता ते 28 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
कधीपासून सुरु आहे विक्री?
28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून iPhone 16e ची विक्री भारतात सुरु करण्यात आली आहे. हा फोनमध्ये ग्राहकांना ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ग्राहक ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्लॅटफॉर्म्सवरून हा फोन खरेदी करू शकतात.
लोन रिकवरीसाठी आता होणार WhatsApp चा वापर, अशी होणार कर्जाची वसूली! जाणून घ्या सविस्तर
iPhone 16e चे स्पेसिफिकेशन्स
नवीन iPhone 16e हा ड्युअल सिम (Nano+eSIM) हँडसेट आहे, जो iOS 18 वर चालतो. यात 60Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेससह 6.1-इंच सुपर रेटिना XDR (1,170×2,532 पिक्सेल) OLED स्क्रीन आहे. डिस्प्लेमध्ये ॲपलचे सिरॅमिक शील्ड मटेरियल वापरण्यात आले आहे, ज्यामुळे टिकाऊपणा वाढतो. iPhone 16e मध्ये 3nm A18 चिप आहे, जी सप्टेंबर 2024 मध्ये प्रथम iPhone 16 मध्ये दिसली. हे 512GB पर्यंत स्टोरेजसह जोडलेले आहे.यात 8GB RAM असण्याचा अंदाज आहे.
यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह सिंगल 48-मेगापिक्सेल रियर कॅमेरा आहे. फ्रंटला 12-मेगापिक्सेल TrueDepth कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी आहे. त्यात फेस आयडीसाठी आवश्यक सेन्सर्स आहेत. यामध्ये थर्ड जनरेशन iPhone SE चे टच आयडी होम बटन काढून टाकण्यात आले आहे.
याशिवाय यात स्टिरिओ स्पीकर्स आहेत आणि ते 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC आणि GPS कनेक्टिव्हिटी ऑफर करतात. हे निवडक प्रदेशांमध्ये सॅटेलाइट फिचरद्वारे आपत्कालीन SOS ला देखील समर्थन देते. त्याच्या मागील मॉडेल्सच्या तुलनेत, हे नवीन मॉडल USB टाइप-सी पोर्ट आहे जो 18W वायर्ड चार्जिंग आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. हा हँडसेट IP68 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट आहे. याच्या वजनाविषयी बोलणे केले तर हा फोन 167 ग्रॅम वजनाचा आहे आणि याचे माप 146.7mm x 71.5mm x 7.8mm इतके आहे.