Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नविटास प्लॅनेटची जागतिक झेप! तब्बल २० दशलक्ष डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय कंत्राट प्राप्त 

नविटास सोलरच्या 'नविटास प्लॅनेट' या ईपीसी शाखेला झांबियामध्ये ५४ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे २० दशलक्ष डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय कंत्राट मिळाले आहे. या प्रकल्पामुळे वार्षिक ४२,५७० टन कार्बन उत्सर्जन कमी होणार असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसह कंपनीच्या जागतिक विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 19, 2026 | 07:05 PM
नविटास प्लॅनेटची जागतिक झेप! तब्बल २० दशलक्ष डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय कंत्राट प्राप्त 
Follow Us
Follow Us:

नविटास सोलरने आज जाहीर केले की, त्यांची समर्पित इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (ईपीसी) शाखा नविटास प्लॅनेटला झांबियाच्या सेरेन्जे प्रोव्हिन्‍समध्ये ५४ मेगावॅटचा युटिलिटी-स्केल सौर ऊर्जा प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कंत्राट मिळाले आहे. हा प्रोजेक्ट नविटास सोलरच्या जागतिक विस्तार धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि आफ्रिकेच्या झपाट्याने वाढणाऱ्या अक्षय ऊर्जा क्षेत्रात कंपनीची उपस्थिती दृढ करतो.

या ईपीसी कंत्राटांतर्गत, नविटास प्लॅनेट सौर ऊर्जा प्रकल्पाचे इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट, कन्स्ट्रक्शन आणि कमिशनिंग (कार्यान्वित करणे) यांसह सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण प्रोजेक्ट अंमलबजावणी स्वतः करेल. या प्रोजेक्टमध्ये नविटास सोलरचे उच्च कार्यक्षमतेचे बायफेशिअल टॉपकॉन मॉड्यूल्स आणि आघाडीच्या जागतिक उत्पादकांकडून मिळवलेले इतर मुख्य घटक वापरले जातील. हा प्रोजेक्ट साधारणतः सात ते आठ महिन्यांच्या अंमलबजावणीच्या कालावधीत पूर्ण होऊन कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

प्रगत एआय तंत्रज्ञानासह सॅमसंगचे नवीन ‘गॅलेक्सी वॉच’ लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या काय असेल खास!

नविटास सोलरचे संचालक सुनय शाह म्हणाले, “हा प्रोजेक्ट नविटास प्लॅनेटच्या आंतरराष्ट्रीय विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि भारतात अक्षय ऊर्जा कौशल्याची वाढती जागतिक मागणी निदर्शनास आणतो. झांबिया आपले ऊर्जा स्रोत सक्रियपणे वैविध्यपूर्ण करत आहे, ज्यामुळे युटिलिटी-स्केल सौर ऊर्जा विकासासाठी उत्तम संधी निर्माण होत आहेत. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही आफ्रिकेच्या शाश्वत ऊर्जा भविष्यात योगदान देणारे दीर्घकालीन सहयोग निर्माण करत विश्वासार्ह, उच्च दर्जाच्या स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत.”

अक्षय ऊर्जा क्षमतेचा विस्तार करण्यापलीकडे या प्रोजेक्टमुळे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय आणि आर्थिक फायदे मिळण्याची अपेक्षा आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर वार्षिक जवळपास ४२,५७० टन कार्बन उत्सर्जन कमी करत स्वच्छ वीज निर्मिती करेल, अशी अपेक्षा आहे. बांधकाम आणि संबंधित प्रोजेक्टच्या कामांदरम्यान यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, ज्यायोगे स्थानिक आर्थिक विकासाला आणि कौशल्य निर्मितीला चालना मिळेल.

रिक्षा गॅसवर नक्की कशी चालते? आणि ड्रायव्हर सीटशेजारील ‘स्टार्टिंग लिव्हर’चा गेम काय असतो?

हा प्रोजेक्ट पॅरिस करारांतर्गत झांबियाच्या नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्सला (एनडीसी) अधिक पाठबळ देतो, ज्याचे उद्दिष्ट २०३० पर्यंत ग्रीनहाऊस गॅस (हरितगृह वायू) उत्सर्जनात ४७ टक्‍के घट करण्याचे आहे. नविटास प्लॅनेटचा आफ्रिकेतील हा पहिला युटिलिटी-स्केल ईपीसी प्रोजेक्ट असल्याने ही घडामोड संपूर्ण खंडात कंपनीच्या दीर्घकालीन विकास धोरणासाठी प्रबळ पाया तयार करते, जिथे विश्वासार्ह, परवडणाऱ्या आणि शाश्वत ऊर्जा पायाभूत सुविधांची मागणी सातत्याने वाढत आहे.

Web Title: Navitas solar international expansion africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • Solar
  • technology

संबंधित बातम्या

Chicago Pneumatic चं नवं तंत्रज्ञान, CPS 950-300 पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर लाँच; आता कठीण ड्रिलिंग कामंही होणार अधिक सुलभ
1

Chicago Pneumatic चं नवं तंत्रज्ञान, CPS 950-300 पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर लाँच; आता कठीण ड्रिलिंग कामंही होणार अधिक सुलभ

अॅडिडासच्या गुरुग्राम टेक हबला मोठा धक्का; 350 हून जास्त कर्मचाऱ्यांवर कपातीची शक्यता
2

अॅडिडासच्या गुरुग्राम टेक हबला मोठा धक्का; 350 हून जास्त कर्मचाऱ्यांवर कपातीची शक्यता

iQOO 16 चीनमध्ये लाँच होण्यापूर्वी चर्चेत; किंमत, दमदार बॅटरी, डिस्प्ले आणि खास फीचर्स जाणून घ्या
3

iQOO 16 चीनमध्ये लाँच होण्यापूर्वी चर्चेत; किंमत, दमदार बॅटरी, डिस्प्ले आणि खास फीचर्स जाणून घ्या

अॅमेझॉनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नेटवर्क विस्तार; २० नवीन फुलफिलमेंट सेंटर्ससह १५० डिलिव्हरी स्टेशन
4

अॅमेझॉनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नेटवर्क विस्तार; २० नवीन फुलफिलमेंट सेंटर्ससह १५० डिलिव्हरी स्टेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.