Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या

FIFA World Cup Launch Edition Game: नेटफ्लिक्सवर लवकरच एक नवीन मल्टिप्लेअर गेम लाँच केला जाणार आहे. याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. सध्या ब्रीझीलमध्ये या आगामी गेमची चाचणी सुरु आहे. लवकरच हा गेम तब्बल 20 देशांमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2026 | 09:05 AM
Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या

Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • फिफा वर्ल्ड कप: लाँच एडीशन गेम 11 जून 2026 रोजी नेटफ्लिक्सवर लॉन्च होणार असून सबस्क्राइबर्सना तो मोफत खेळता येणार आहे.
  • या गेममध्ये FIFA World Cup 2026 मधील सर्व 48 संघ, 16 अधिकृत स्टेडियम आणि 1,248 खेळाडूंचा समावेश असणार आहे.
  • स्मार्टफोन कंट्रोलर म्हणून वापरून टीव्हीवर गेम खेळता येणार असून एका स्क्रीनवर 4 खेळाडूंना मल्टीप्लेयर सपोर्ट मिळणार आहे.
FIFA World Cup: नेटफ्लिक्स एक नवीन आणि जबरदस्त गेम घेऊन येत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, हा नवा गेम फिफा वर्ल्ड कप: लाँच एडीशन (FIFA World Cup: Launch Edition) या नावाने सादर केला जाणार आहे. हा नवीन गेम 11 जून 2026 पासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजेच ज्या दिवशी गेम लाँच केला जाणार आहे, म्हणजेच 11 जून रोजी फिफा वर्ल्ड कप 2026 ची देखील सुरुवात होणार आहे. प्लेअर्स हा गेम केवळ नेटफ्लिक्स गेम्सद्वारे खेळू शकणार आहेत आणि हा गेम खेळण्यासाठी कोणतेही वेगळे सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची गरज नाही. ज्या यूजर्सकडे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन आहे, असे यूजर्स हा गेम मोफत खेळू शकणार आहेत.

तगड्या फीचर्ससह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… 6,500mAh बॅटरीने सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

कोणत्या देशात उपलब्ध असणार नवा नेटफ्लिक्स गेम?

नेटफ्लिक्सने ब्रीझीलमध्ये फिफा वर्ल्ड कप: लाँच एडीशनची चाचणी सुरु केली आहे. लाँचिंगवेळी नेटफ्लिक्सची टिव्ही गेमिंग सिरीज 20 देशांमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि मेक्सिको सारख्या देशांचा समावेश असणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, येणाऱ्या काळात हा गेम जास्तीत जास्त देशांमध्ये उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

फिफा वर्ल्ड कप: लाँच एडीशन गेममध्ये काय असणार खास?

या गेममध्ये फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होणारे सर्व 48 संघ असणार आहे. प्लेअर्स 16 अधिकृत स्टेडिअममध्ये मॅच खेळू शकणार आहेत. यासोबतच टूर्नामेंटमध्ये सहभागी अललेल्या 1,248 खेळाडूांपैकी त्यांच्या आवडीचा एक खेळाडू निवडून त्याला मैदानात उतरवू शकतील.

स्मार्टफोनमध्ये फिफा वर्ल्ड कप: लाँच एडीशन गेम खेळण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

नेटफ्लिक्सने हा गेम अतिशय सोप्या पद्धतीने डिझाईन केला आहे. सर्वात आधी सपोर्टेड स्मार्टटिव्हीमध्ये नेटफ्लिक्स गेम्स सेक्शन ओपन करा. यानंतर गेम लाँच झाल्यानंतर स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसणार आहे. हा क्यूआर कोड तुम्हाला स्मार्टफोनने स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा फोन गेमच्या कंट्रोलरमध्ये बदलणार आहे. आता प्लेअर्स त्यांच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्वाईप करून पास, शॉट आणि इतर हालचाली कंट्रोल करू शकणार आहेत. नेटफ्लिक्सचं असं म्हणणं आहे की, या गेममध्ये तुमचा स्मार्टफोन कंट्रोलर असणार आहे आणि तुमचा टिव्ही स्टेडिअम. यामुळे कोणत्याही वेगळ्या गेमिंग कन्सोलशिवाय मोठ्या स्क्रीनवर फुटबॉल गेम खेळण्याचा अनुभव मिळेल.

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी… अन्यथा होईल पश्चाताप

नव्या गेममध्ये मल्टीप्लेअर सपोर्ट

नेटफ्लिक्सने या नव्या गेममध्ये मल्टीप्लेअर सपोर्ट देखील दिला आहे. म्हणजेच एकाच स्क्रीनवर जास्तीत जास्त 4 प्लेअर्स एकत्र मॅच खेळू शकणार आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि कुटूंबियांसोबत मिळून गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकणार आहात. कंपनीचं म्हणणं आहे की, लाँच एडीशन केवळ एक सुरुवात आहे आणि भविष्यात यामध्ये नवीन फीचर्स आणि अपडेट्स जोडले जाणार आहेत.

Web Title: Netflix will launch fifa world cup launch edition game on 11 june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Netflix
  • online games

संबंधित बातम्या

‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट
1

‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट

विश्वविजेत्या Spain वर पैशांचा पाऊस! Fifa World Cup जिंकताच तब्बल 480 कोटींचे बक्षिस अन्…
2

विश्वविजेत्या Spain वर पैशांचा पाऊस! Fifa World Cup जिंकताच तब्बल 480 कोटींचे बक्षिस अन्…

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप
3

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप

FIFA World Cup 2026 Final: लामिन यमालचा धमाका! World Record करत रचला इतिहास, मेस्सीचं स्वप्नं भंगलं
4

FIFA World Cup 2026 Final: लामिन यमालचा धमाका! World Record करत रचला इतिहास, मेस्सीचं स्वप्नं भंगलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.