Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी... अन्यथा होईल पश्चाताप
स्मार्टवॉचचा आकार छोटा असला तरी फायदे मोठे आहेत. त्यामुळे अनेक लोकं हल्ली स्मार्टवॉचचा वापर करताना पाहायला मिळतात. अनेकांना असं वाटतं की सर्व कंपन्या त्यांच्या स्मार्टवॉचमध्ये एकसारखे फीचर्स ऑफर करतात. त्यामुळे अनेकजण स्मार्टवॉचचे फीचर्स न पाहता केवळ डिझाईन पाहून डिव्हाईस खरेदी करतात. तुम्ही देखील असाच विचार करून स्मार्टवॉच खरेदी करत असाल तर नक्कीच तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. स्मार्टवॉच खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टवॉच हे स्मार्टफोनचा एक भाग म्हणून डिझाईन करण्यात आले आहे. स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनमधील अनेक महत्त्वाचे फीचर्स केवळ मनगटावरून मॅनेज करू शकता. यामुळे स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच यांच्यामध्ये सुसंगतता असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणतेही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्यापूर्वी ते तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉईड स्मार्टफोनसोबत योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही हे तपासा.
स्मार्टफोन आणि दुसऱ्या गॅझेट्सप्रमाणेच स्मार्टवॉच देखील वेगवेगळे फीचर्स, डिझाईन आणि प्राईज सेगमेंटमध्ये उपलब्ध असतात. जर तुम्ही अॅपल किंवा सॅमसंग सारख्या कंपन्यांचे स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे खर्च करावे लागू शकतात. कारण या कंपन्यांचे स्मार्टवॉच सहसा प्रिमियम सेगमेंटमध्ये उपलब्ध असतात. पण जर तुमचे बजेट थोडे कमी असेल तर तुम्ही इतर कंपन्यांच्या स्मार्टवॉचचा विचार करू शकता. स्मार्टवॉच खरेदी करण्यापूर्वी, उपलब्ध पर्यायांवर एक नजर टाका आणि तुमच्या बजेटनुसार आवश्यक फीचर्सवर लक्ष केंद्रित करा आणि खरेदीचा योग्य निर्णय घ्या.
स्मार्टवॉच खरेदी करण्याचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा तुम्ही यामधील सर्व फीचर्सचा वापर करता. मात्र यासाठी तुम्हाला स्मार्टवॉच दिर्घकाळ तुमच्या मनगटावर घालावे लागते. यासाठी सर्वात महत्त्वाती गोष्ट म्हणजेच कंफर्ट. जर तुम्ही डिझाईन आणि रंग पाहून असे एखादे स्मार्टवॉच खरेदी केले, ज्यामुळे तुमच्या हाताला त्रास होत असेल, मनगट दुखत असेल, तर याचा काहीच फायदा नाही. बऱ्याच लोकांना सिलिकॉन बँड आवडत नाहीत, तर काहींना मेश बँडच्या टिकाऊपणाबद्दल चिंता वाटते. त्यामुळे, आरामदायीपणाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला
स्मार्टवॉचमध्ये अनेक खास फीचर्स ऑफर केले जातात. मात्र सर्वच यूजर्सना प्रत्येक फीचरची गरज असेलच असं नाही. सहसा कंपन्या काही फीचर्स केवळ मार्केटिंगसाठी वापरतात. मात्र सामान्य यूजर्सना त्याचा खरंच फायदा होईलच असं नाही. त्यामुळे तुम्ही खरेदी,करत असलेल्या स्मार्टवॉचमध्ये कोणते फीचर्स आहेत, तपासा. काही लोकं उत्साहात फीचर-लोडेड स्मार्टवॉच खरेदीस करतात. मात्र नंतर या फीचर्सचा काहीच उपयोग होत नाही. स्मार्टवॉचमध्ये जितके जास्त फीचर्स असतील तुम्हाला नोटिफिकेशन आणि अलर्टचा वारंवार सामना करावा लागू शकतो.
Ans: स्मार्टवॉच हे मनगटावर घालायचे स्मार्ट उपकरण आहे, जे वेळ दाखवण्याबरोबरच फिटनेस, आरोग्य आणि नोटिफिकेशनसारखी फीचर्स देते.
Ans: काही फीचर्स वापरता येतात, पण पूर्ण सुविधांसाठी स्मार्टवॉच फोनशी कनेक्ट करणे आवश्यक असते.
Ans: होय, अनेक स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग किंवा eSIM कॉलिंगची सुविधा उपलब्ध असते.






