
BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन... लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात
VijayaDashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts
जर तुमचा फोन BGMI खेळताना हँग होत असेल किंवा गरम होत असेल किंवा स्टोरेज कमी असल्यामुळे तुम्हाला BGMI खेळता येत नसेल तर तुम्ही Krafton चा नवीन गेम खेळू शकता. 15 ऑक्टोबर 2026 रोजी कंपनीने याबाबत घोषणा केली आहे. BGMI गेमिंग अनुभव जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कमी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोन यूजर्सना देखील BGMI खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी गेमचे नवीन वर्जन तयार केले जात आहे. कंपनीने अद्याप या गेमच्या लाँट डेटचा खुलासा केला नाही. (फोटो सौजन्य: BGMI)
Krafton ने यापूर्वी हा गेम BGMI Lite या नावाने सादर केला होता. आता कंपनीने या गेमचे नाव बदलून BGMI Air असे केले आहे. BGMI चा मुख्य गेमिंग अनुभव हलक्या डाऊनलोडसह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. नाव बदलल्यामुळे गेमचे सर्वच फीचर्स बदलणार नाहीत. कंपनीने सध्या केवळ गेमच्या नवीन नावाची घोषणा केली आहे आणि हलक्या वर्जनसह हा गेम सादर करण्याची योजना बनवली आहे. गेमचे सर्व फीचर्स, ग्राफिक्स आणि फोनची महत्त्वाची माहिती अद्याप शेअर करण्यात आली नाही.
BGMI Air ची सर्वात मोठी विशेषत: म्हणजेच त्याची छोटी डाऊनलोड साईज. सुरुवातीचे डाऊनलोड सुमारे 1GB असणार आहे. ज्यांच्या फोनमध्ये कमी स्टोरेज आहे किंवा ज्यांना जास्त मोठे गेम डाऊनलोड करायचे नाहीत, अशा यूजर्ससाठी हे नवीन अपडेट फायद्याचे ठरणार आहे. लक्षात ठेवा की, गेमचे सुरुवातीचे डाऊनलोड सुमारे 1GB असणार आहे, याचा अर्थ असा नाही की, गेम इंस्टॉल केल्यानंतर फोनमध्ये केवळ इतकीच जागा व्यापणार आहे. गेमचा इतर डेटा आणि अपडेटमुळे जास्त स्टोरेजची आवश्यकता असू शकते. गेमचे सर्व मोड्स आणि फाईल्स डाऊनलोड केल्यानंतर एकूण किती जागा व्यापली जाईल, याबाबत अद्याप कंपनीने स्पष्टपणे माहिती दिली नाही.
Ans: Krafton India ने BGMI Lite चे नाव बदलून BGMI Air असे केले आहे.
Ans: BGMI Air चा सुरुवातीचा डाउनलोड साइज सुमारे 1GB असणार आहे. अतिरिक्त डेटा आणि अपडेट्समुळे अधिक स्टोरेज लागू शकते.
Ans: कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 1 कोटींहून अधिक लोकांनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केले आहे.