तगड्या फीचर्ससह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री... 6,500mAh बॅटरीने सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!
विवोने त्यांचा नवीन स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. डिव्हाईसच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत AED 1,099 म्हणजेच सुमारे 28,550 रुपये आहे, तर 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत AED 1,299 म्हणजेच सुमारे 33,750 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्डन या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकणार आहेत. या डिव्हाइसमध्ये 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसचा डिस्प्ले हार्डवेयर मागील मॉडेलसारखा दिसत आहे. फोनमध्ये FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट वाला 6.77-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला पंच-होलमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आमि स्क्रीनच्या खाली ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे.
या डिव्हाईसमध्ये मीडियाटेकचे डाइमेंसिटी 7400 टर्बो चिपसेट मिळणार आहे, जो V60 Lite मध्ये वापरलेल्या डाइमेंसिटी 7360 चे अपग्रेड आहे. दोन्ही चिप्स बऱ्याच प्रमाणात समान आहेत. मात्र परंतु डायमेन्सिटी 7400 टर्बोच्या ARM कॉर्टेक्स-A78 परफॉर्मन्स कोअर्सची गती 2.5 GHz वरून 2.6 GHz पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रोसेसिंगमध्ये थोडी वाढ मिळते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, विवोच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर वाला आयएमएक्स 882 सेंसर आणि 8MP चे अल्ट्रावाइड लेंस मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. हे डिव्हाइस अँड्रॉईड16 वर आधारित असलेल्या ओरिजिन ओएस 6 वर चालते.






