
एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर
Samsung ची मोठी ऑफर! यूजर्सना फ्री मिळणार 10 हजारांचं Amazon गिफ्ट कार्ड, फक्त करावे लागणार ‘हे’ काम
आता अखेर 3 महिन्यांंनंतर गुगल फोटोजमध्ये मीम फीचर रोल आऊट करण्यात आलं आहे. हे फीचर गुगलचे दुसरे क्रिएटिव फीचर्स जसे एडिटिंग, व्हिडीओ, रीमिक्स कंटेंट आणि कोलाजिंगमध्ये एक नवीन एडिशन आहे. ज्यांना आधीच अॅपमध्ये सादर करण्यात आले आहे. हे फीचर ऑप्शनल आहे. म्हणजेच हे फीचर तेव्हाच काम करणार आहे, जेव्हा यूजर्स स्वत: एखादा फोटो निवडतात. गुगलचं असं म्हणणं आहे की, हे टूल शेयरिंगसाठी डिझाईन करण्यात आले आहे आणि हे टूल आपोआप कंटेट तयार करत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलीकडेच गुगलने त्यांच्या सपोर्ट पेजवर एका कम्युनिटी मॅनेजरद्वारे या फीचरची घोषणा केली होती. मी मीम हे गुगल फोटोजमधील वाढत्या क्रिएटिव्ह टूल्सचा एक भाग आहे जे यूजर्सना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यास मदत करते. या टूलच्या मदतीने यूजर्स एक फोटो निवडू शकतात आणि स्वत:ला प्रसिद्ध मीम फॉर्मेटमध्ये तयार टेक्स्टसह पाहू शकतात. यूजर्स कॅप्शन देखील बदलू शकतात किंवा जोकसोबत फोटो अधिक चांगल्या प्रकारे जुळण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची मीम स्टाइल अपलोड करू शकता.
गुगलने सांगितलं आहे की, प्रायव्हसी पूर्णपणे यूजर्सच्या कंट्रोलमध्ये असणार आहे. मी मीम केवळ यूजर्सनी निवडलेल्या फोटोंवर काम करणार आहे आणि ऑटोमॅटिकली चालणार नाही. जोपर्यंत बनवलेला मीम यूजर्स सेव्ह किंवा शेअर करत नाही तोपर्यंत हा फोटो अॅपमध्येच राहणार आहे. हे मीम्स स्टोरेज स्पेस घेतील की नाही याबाबत अद्याप गुगलने स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु तयार केलेल्या फायली सामान्यतः नवीन आयटम म्हणून सेव्ह केल्या जातात. तसेच, हे लक्षात ठेवा की हे फीचर सध्या फक्त युनायटेड स्टेट्समध्ये सक्रिय आहे.