
Free Fire Max: Gaming Items मिळण्यासाठी डायमंड खर्च करण्याची गरज नाही! Garena ने जारी केले नवे रेडिम कोड्स
Free Fire Max गेमर्समध्ये गेमिंग आयटम्सची मागणी जास्त आहे. या गेमिंग आयटम्समध्ये वेपन स्किन, इमोट, बंडल, ग्लू वॉल, पेट आणि कॅरेक्टर इत्यादीचा समावेश आहे. पण असे अनेक गेमर्स आहेत, जे डायमंड नसल्यामुळे गेमिंग आयटम्स खरेदी करू शकत नाहीत. याच कारणामुळे Garena गेमर्ससाठी गेमिंग ईव्हेंट आणि रेडिम कोड जारी करत असते. या गेमिंग ईव्हेंट आणि रेडिम कोडद्वारे गेमर्सना एक्सक्लूसिव आयटम्स मिळवण्याची संधी मिळते. यासाठी डायमंड खर्च करण्याची देखील गरज नाही. नेहमीप्रमाणे आज देखील Garena ने गेमर्सना एक्सक्लूसिव गेमिंग आयटम्स मिळावेत, यासाठी रेडिम कोड्स जारी केले आहेत.
अनेक फ्री फायर मॅक्ससाठी तासंतास गेम खेळत असतात. अशाच गेमर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी Garena नेहमी स्पेशल रेडिम कोड्स जारी करत असते. हे रेडिम कोड्स म्हणजे डायमंडशिवाय एक्सक्लूसिव गेमिंग आयटम्स अनलॉक करण्याची संधी आहे. सहसा गेमर्स अशा एक्सक्लूसिव गेमिंग आयटम्सच्या शोधात असतात, ज्यांना मिळवण्यासाठी डायमंड खर्च करावे लागत नाही. असेच एक्सक्लूसिव गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी गेमर्स रेडिम कोड्सचा वापर करत असतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire MAX चे रिडीम कोड कमाल असतात. या रेडिम कोड्सची गेमर्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा वापर करून गेमर्स स्किन, बंडल, इमोट आणि लूट क्रेट सारखे एक्सक्लूसिव गेमिंग आयटम्स मोफत मिळवू शकतात. हे कोड्स अल्फान्यूमेरिक असतात. म्हणजेच यामध्ये अंक आणि अक्षरं अशा दोन्हींचा समावेश असतो. नेहमीप्रमाणे Garena ने आज देखील गेमर्ससाठी रेडिम कोड्स जारी केले आहेत. लक्षात ठेवा, या रेडिम कोड्सची व्हॅलिडीटी ठरलेली असते.
Free Fire Max मध्ये अलीकडेच Squid Game Ring ईव्हेंट सुरु करण्यात आला आहे. या गेममध्ये तुम्हाला Squid Game इंस्पायर्ड इन-गेम आइटम्स फ्रीमध्ये मिळवण्याची संधी मिळणार आहे. या आयटम्समध्ये Red Light Green Light Gloo Wall Skin आणि Pink Guard Super Bundle सारख्या आयटम्सचा समावेश आहे. याशिवाय या ईव्हेंटमध्ये तुम्हाला टोकन मिळणार आहे.
गेम डेवलपर कंपनीने Netflix ची पॉपुलर सीरीज Squid Game च्या कॉलेब्रेशनमध्ये अनेक ईव्हेंट्स Free Fire Max गेममध्ये लाईव्ह झाले आहेत. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन, प्लेअर्सना स्क्विड गेमचे लोकप्रिय गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळत आहे. जर तुम्ही देखील या सिरीजचे चाहते असाल, तर तुम्ही या नवीनतम ईव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकता आणि स्क्विड गेमपासून प्रेरित वस्तू मोफत जिंकू शकता.