चमत्कार! 20 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या महिलेला Elon Musk च्या चिपने पुन्हा केलं जिवंत! कसं काम करतं Neuralink?
जगात पहिल्यांदाच एक मोठा चमत्कार घडला आहे. जगात पहिल्यांदाच एका महिलेने तिच्या विचारांनी कंप्युटर कंट्रोल केला आहे. हे सर्व Elon Musk च्या Neuralink चिपने शक्य झालं आहे. जी महिला 20 अंथरुणाला खिळलेली होती, तीच महिला आता केवळ विचार करून कंप्युटरवर तिचं नाव लिहीण्यात यशस्वी केली आहे. अमेरिकेतील ऑड्री क्रूज, जी गेल्या 20 वर्षांपासून अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेली होती, तिने आता Neuralink ब्रेन इम्प्लांटच्या मदतीने कंप्यूटरला हात न लावता तिचं नाव लिहीलं आहे. तिने केवळ विचार केला, कोणतीही हालचाल केली नाही. पण हे सर्व शक्य झालं Neuralink ब्रेन इम्प्लांटमुळे.
ऑड्रीने तिच्या @NeuraNova9 नावाच्या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत, फोटोमध्ये तिने डिजिटल स्क्रीनवर लिहीलेलं तिचं नाव “Audrey” दिसत आहे. एवढंच नाही तर तिने आणखी काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये तिने हृदय, चेहरा, चिमणी आणि पिज्जा सारखे काही रंगीन डूडल बनवले आहेत. हे सर्व केवळ तिच्या विचाराने शक्य झालं आहे, यासाठी तिने कोणतीही शारीरिक हालचाल केली नाही. “कल्पना करा की तुमचे बोट माऊसवर क्लिक करत आहे आणि तुमचे मनगट कर्सर हलवत आहे – पण प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. ते टेलिपॅथीद्वारे संगणक चालवण्यासारखे आहे,” असे तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो सौजन्य – X)
Here’s more information about how my BCI, brain computer interface, implant works and my surgery. I had surgery last week and everything is going amazing. It was brain surgery, they drilled a hole in my skull and placed 128 threads into my motor cortex. The chip is about the size…
— Audrey Crews (@NeuraNova9) July 28, 2025
Here are some more of my doodles! Im taking request. Lol Imagine your pointer finger is left click and the cursor moment is with your wrist. With out physically doing it. Just a normal day using telepathy. pic.twitter.com/MDzIp1Z9jv
— Audrey Crews (@NeuraNova9) July 28, 2025
I tried writing my name for the first time in 20 years. Im working on it. Lol #Neuralink pic.twitter.com/xzPBam5mAS
— Audrey Crews (@NeuraNova9) July 26, 2025
Neuralink एक ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस (BCI) टेक्नोलॉजी आहे. ही टेक्नोलॉजी Elon Musk ने 2016 मध्ये सुरु केली होती. याचा उद्देश असा आहे की, मानवी मेंदूंना थेट संगणकांशी जोडणे. जेणेकरून अर्धांगवायूसारख्या आजारांनी ग्रस्त असलेले लोक डिजिटल जगाशी पुन्हा जोडले जाऊ शकतील. ऑड्रे ही न्यूरालिंकच्या प्राइम क्लिनिकल ट्रायलची रुग्ण 9 आहे. ती म्हणाली, “माझ्या डोक्यात छिद्र करून मोटर कॉर्टेक्समध्ये 128 पातळ धागे घातले आहेत. चिपचा आकार एक क्वार्टर आहे.”
ही चिप रुग्णच्या मेंदूतील मूवमेंट सेंटरमधून सिग्नल वाचते आणि हे सिग्नल कंप्यूटर कर्सरच्या मूवमेंटमध्ये बदलते. याचा अर्थ असा आहे की, न्यूरालिंकच्या प्राइम क्लिनिकल ट्रायलची रुग्ण 9 ऑड्री केवळ विचार करून कंप्यूटरवर क्लिक आणि मूवमेंट करू शकते. हे सर्व स्वत: माऊस वापरण्यासारखे आहे. जरी ही चिप तिला चालण्यास मदत करणार नसली तरी, ती आता रिअल-टाइममध्ये डिजिटल डिव्हाइस नियंत्रित करू शकते, आणि तेही पूर्णपणे तिच्या मनाचा वापर करून, यासाठी कोणतीही शारिरीक हालचाल करण्याची देखील गरज नाही.
Free Fire Max: फ्रीमध्ये मिळणार Gaming Items… Garena गेमर्ससाठी घेऊन आलीये स्पेशल रिडीम कोड्स
एक नवीन सुरुवात ऑड्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत Neuralink सोबतचे अनुभव शेअर करत आहे आणि यापुढे देखील ती आणखी व्हिडीओ पोस्ट करण्याचा विचार करत आहे. “मी लवकरच घरी येत आहे आणि त्यानंतर मी आणखी व्हिडिओ पोस्ट करेन ज्यामध्ये प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन केले जाईल.” तिचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे, परंतु तिने जगाला दाखवून दिले आहे की तंत्रज्ञान आणि मानवी विचारसरणी एकत्रितपणे काय चमत्कार करू शकतात.